Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बायकोचा ५ पुजाऱ्यांसह धार्मिक विधी! नवऱ्याचं डोकं फिरलं,पत्नीसह मुलाची अन् २ पुजाऱ्यांची हत्या; ७ तासांचा थरार, गोळीबार अन् शेवटी मृत्यू…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 24 September 2026, 16:30

आझमगढ : उत्तर प्रदेशातील आझमगढ येथे धार्मिक विधी सुरू असताना गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. अरविंद नावाच्या व्यक्तीने पत्नी, मुलगा आणि दोन पुजाऱ्यांवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर त्याने स्वतःला तीन मुलांसह एका खोलीत कोंडून घेतले. जवळपास सात तास ही तणावपूर्ण परिस्थिती कायम होती. अखेर अरविंदने पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, धार्मिक विधीदरम्यान झालेल्या गोळीबारात अरविंदची पत्नी आणि दोन पुजाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने स्वतःची दोन मुले आणि मेहुणीच्या मुलाला एका खोलीत कोंडून घेतले. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी अरविंदला शरणागती पत्करण्यास आणि मुलांना सुरक्षितपणे बाहेर सोडण्यास सांगितले. त्याला समजावण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांचीही मदत घेण्यात आली.

आझमगढचे एसएसपी डॉ. अनिल कुमार यांच्या माहितीनुसार, अरविंदने पोलिस कर्मचारी आणि कुटुंबीयांना गोळीबाराची तसेच मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. याच दरम्यान त्याने स्वतःच्या मुलावर गोळी झाडल्याचा आवाज पोलिसांना आला. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पोलिसांनी घरात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

वाराणसी झोनचे एडीजी नवीन अरोरा यांनी सांगितले की, पोलिसांनी सुरुवातीला संयमाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. अरविंद बाहेर येण्यास तयार नव्हता आणि सकाळपर्यंत पोलिसांनी वाट पाहावी, अशी मागणी करत होता. मात्र, सुमारे सात तास वेढा घातल्यानंतरही त्याने शरणागती पत्करली नाही.

 

दरम्यान, अरविंदने घरातून पोलिसांवर गोळीबार केल्यानंतर एसएसपी आणि एसओजी पथकातील काही कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. पोलिसांनी स्टन ग्रेनेड आणि अश्रूधुराचा वापर केला. त्यानंतर अरविंदने पोलिसांवर गोळीबार केल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यात अरविंद जखमी झाला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी तिन्ही मुलांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी गोळी लागलेल्या अरविंदच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दोन मुलींवर उपचार करण्यात आले.

स्थानिक रहिवाशाच्या माहितीनुसार, धार्मिक विधीसाठी पाच पुजारी घरात आले होते. अरविंदने पूजा कशासाठी केली जात आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर वाद सुरू झाला. त्यानंतर त्याने पत्नी आणि दोन पुजाऱ्यांवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. इतर तीन पुजारी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पदवीधर असूनही झटपट श्रीमंत होण्याची घाई! पुण्यातल्या तरुणानं पैशांसाठी निवडला भलताच मार्ग; सत्य समजताच पोलिसही हैराण

Friday, 25 September 2026, 18:03

त्या दोघी घरच्यांशी खोटं बोलून निघाल्या; नमनने न विचारता गाडी काढली अन् नंतर घडला अनर्थ, एका क्षणात सर्व उध्वस्त…

Friday, 25 September 2026, 16:50

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ खलबतं? पार्थ पवारांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण,पडद्यामागे नेमकं काय?

Friday, 25 September 2026, 16:19

फुरसुंगीत पहाटे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; छिन्नी-हातोड्याने मशीनची तोडफोड

Friday, 25 September 2026, 16:17

पात्र असूनही मतदार नोंदणी राहिलीये का? शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी शेवटची संधी; उद्या २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

Friday, 25 September 2026, 15:55

लालबागच्या राजाच्या मंडपाजवळ नेमकं काय घडलं? 68 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूने खळबळ

Friday, 25 September 2026, 15:51
Next Post

3 तोळ्यांची सोन्याची चैन बैलाच्या पोटात! 10 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शस्त्रक्रिया यशस्वी,चर्चांना उधाण!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp