Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामती दौरा ठरला! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २४ ऑक्टोबरला होणार ‘प्रेरणास्थळा’चे भव्य उद्घाटन

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 24 September 2026, 17:35

पुणे: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा अखेर निश्चित झाल्याची माहिती बुधवारी (दि. २३) समोर आली. २४ ऑक्टोबर रोजी मोदी विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’चे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) संस्थेची पाहणी आणि त्याबाबतचे सादरीकरणही पंतप्रधानांसमोर होण्याची शक्यता आहे.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी बारामतीतील नक्षत्र गार्डन येथील ‘प्रेरणास्थळा’ची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विद्या प्रतिष्ठानच्या मुख्यालयात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी युवा नेते युगेंद्र पवार, विश्वस्त विठ्ठल मणियार, प्रताप पवार, कृषी विकास प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलवडे, विश्वस्त किरण गुजर आणि सचिव नीलिमा गुजर आदी उपस्थित होते.

विद्या प्रतिष्ठान परिसरात उभारण्यात आलेले ‘प्रेरणास्थळ’ तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या स्मृती आणि विचारांना समर्पित आहे. शांतता, समता आणि मानवतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या संकल्पनेमागे आहे. येथे भगवान गौतम बुद्धांचा पुतळा तसेच महापुरुषांच्या चित्रांद्वारे त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा परिचय करून देण्यात आला आहे.

दरम्यान, विद्या प्रतिष्ठानच्या मुख्यालयात बैठकीसाठी पोहोचलेल्या शरद पवार यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यांच्यासाठी तैनात असलेला ह्युमनॉइड एआय रोबोट पवार यांच्याकडे चालत आला आणि त्याने यांत्रिक हात उंचावून त्यांचे स्वागत केले. पवार यांनी रोबोटकडे पाहून ‘चला’ असे म्हटल्यानंतर तो बाजूला झाला. या स्वागताचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Thursday, 24 September 2026, 19:24

पूर्व विदर्भ होणार समृद्ध! ४२ हजार कोटींच्या नव्या महामार्गांना मंजुरी; दळणवळण होणार सुपरफास्ट

Thursday, 24 September 2026, 19:12

आलेगाव पाझर तलाव परिसरात ‘मुरूम माफियांचा’ रात्रीचा धुमाकूळ! पोकलेन-जेसीबीने शासकीय जमिनीची चाळण; महसूल विभाग झोपेत?

Thursday, 24 September 2026, 19:03
Next Post

पेट्रोल-डिझेल, कच्च्या तेलाचे दर वाढणार? तेल कंपन्यांना कोटींचा तोटा; इंधन दरवाढीबाबत मोठी माहिती समोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp