Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चहा घेण्यासाठी थांबले अन् काही मिनिटांत बॅग गायब; कवडीपाट टोलनाक्यावर लॅपटॉप-मोबाईलची चोरी

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 24 September 2026, 17:23

लोणी काळभोर : मुसळधार पावसामुळे चहा घेण्यासाठी कवडीपाट टोलनाका (ता. हवेली) येथील हॉटेलमध्ये थांबलेल्या एका कंपनी मॅनेजरची खुर्चीजवळ ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना मंगळवारी (ता. 22) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. बॅगेत लॅपटॉप आणि मोबाईलसह सुमारे 23 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल होता.

याप्रकरणी हनुमंत गोरख झगडे (वय 42, रा. समर्थसृष्टी, भापकर प्लॉटिंग, कवडीपाट, लोणी काळभोर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,झगडे हे हडपसर येथील एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असून, महाराष्ट्र व गोवा राज्यातील विक्रीचे काम पाहतात.

मंगळवारी कार्यालयाचे काम आटोपून घरी जात असताना मुसळधार पाऊस सुरू असल्याने ते कवडीपाट टोलनाका येथील एका हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबले.झगडे यांनी ग्रे रंगाची बॅग खुर्चीजवळ ठेवली होती. त्यानंतर हॉटेलच्या किचनमध्ये पाहण्यासाठी ते काही वेळ गेले. परत येऊन पाहिले असता खुर्चीजवळ ठेवलेली बॅग गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी हॉटेल चालकाच्या मदतीने परिसरात बॅगचा शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये 15 हजार रुपये किमतीचा एचपी कंपनीचा लॅपटॉप, 8 हजार 400 रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल आणि ग्रे रंगाची सफारी कंपनीची वापरती बॅग यांचा समावेश आहे. मोबाईलमध्ये एअरटेल कंपनीचे सिमकार्ड होते. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बॅग चोरून नेल्याचा संशय व्यक्त करत झगडे यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करीत आहेत.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

अखेर तारीख ठरली! शेतकऱ्यांसाठी शरद पवार स्वतः मैदानात, सरकारसमोर नवं आव्हान उभं राहणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp