उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील जेष्ठ डॅा. मधुकर कुंडलिक पदवाड (वय-89) यांचे आज शुक्रवारी (ता.28) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले आहे. गरीबांचा जीवनदाता हरपल्याने उरुळी कांचन परिसरात शोककळा पसरली आहे.
डॅा.एम.पी.पदवाड यांनी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा पदभार स्वीकारला. त्यानंतर पदवाड यांनी रुग्णांना अल्पदरात चांगल्या सुविधा मिळाव्यात. यासाठी उरुळी कांचन मध्ये एक सुसज्ज रुग्णालय उभारले. पदवाड यांनी उरुळी कांचन मधील रुग्णांना तब्बल 60 वर्षाहून अधिक काळ सेवा दिली.
मधुकर पदवाड यांची पत्नी पुष्पा पदवाड या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. पदवाड दाम्पत्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यांनी मुलगी रश्मी कुलकर्णी यांना प्राध्यापिका केले. तर मुलगा संजय पदवाड याला अभियंता बनविले. रश्मी यांनी महात्मा गांधी विद्यालयात प्राध्यपिका म्हणून ज्ञानदानाचे प्रवित्र काम केले आहे. तर सध्या त्या सेवानिवृत्तही झाल्या आहेत.
दरम्यान, डॅा.एम.पी.पदवाड यांच्या पार्थिवावर उरुळी कांचन येथील स्मशानभूमीत आज शुक्रवारी (ता. 28) सकाळी साडे आकारा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील चांगले व्यक्तिमत्त्व हरपल्याने उरुळी कांचन सह परिसरात शोककळा पसरली आहे.