अजित जगताप
सातारा : माण- खटाव मतदारसंघातील हुकमी नेतृत्व म्हणून आदरणीय माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी दुष्काळी भागाची अस्मिता राखून आपल्या राजकीय पटलावर विजयश्री खेचून आणलेला आहे.
त्यांच्या राजकीय शुद्धीकरणापेक्षा त्यांच्या नेतृत्वगुणाला अधिक संधी असल्यानेच सर्वच राजकीय पक्षाला माजी आमदार घार्गे हे जवळचे वाटणे स्वाभाविक आहे. स्वाभिमानी बाणा म्हणजेच मा. आ. प्रभाकर घार्गे आहेत, असे मत घार्गे यांचे कट्टर समर्थक तानाजीराव पवार व संभाजी राव गोडसे यांनी व्यक्त केले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये सर्व सभासद मतदारांनी कोणतेही अमिषाला बळी न पडता माण- खटावची अस्मिता कायमस्वरूपी राखण्यासाठी निधड्या छातीने मतदान करून विजयश्री खेचून आणलेला आहे.
हा इतिहास काहींना अजूनही जिव्हारी लागला आहे. असे चर्चेतून दिसून येत आहे. मुळातच घार्गे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे पक्षीय मतभेद विसरून सर्वच राजकीय पक्षाचे स्थानिक मातब्बर नेतेमंडळी सहभागी झाले होते. कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या मर्यादित शक्तीपुढे सामुदायिक शक्ती कधीही श्रेष्ठ ठरते. हे खटाव तालुक्यातील दाखवून दिले आहे.
माजी आमदार घार्गे यांचा राजकीय प्रवास हा स्वबळावर झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेच्या निवडणुकीत सातारा- सांगली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद मतदारसंघात प्रभाकर घार्गे यांनाच संधी देऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
परंतु, घार्गे यांच्या नेतृत्वगुणासमोर विरोध नको म्हणून मोठ्या मनाने बिनविरोध निवडून आणण्याची किमया सर्वांनीच केलेली आहे. सध्या भाजप व मुख्यमंत्री शिंदे गट व इतर पक्षांमध्ये घार्गे यांच्यासाठी दरवाजे उघडे ठेवून त्यांची प्रतिक्षा केली जात आहे. ही खरी वस्तुस्थिती आहे.
राजकीय शुद्धीकरण करण्याची त्यांना गरज व इच्छा नसताना चर्चा घडवून आणली गेली आहे. घार्गे यांनी खूप मोठा त्याग करून फार पूर्वीच शुद्ध झालेले आहेत. त्यांना शुद्धीकरणाची गरज नाही. कारण, ते स्वाभिमानी नेतृत्व आहे. त्यांच्या पाठीशी मतदार आहेत.
आगामी निवडणुकीत जे काय घडेल त्यामध्ये माजी आमदार घार्गे यांचा सिंहाचा वाटा असेल हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. वैचारिक बैठक असणाऱ्या या नेत्यांनी खटाव या दुष्काळी तालुक्यासाठी खूप मोठे योगदान दिलेले आहे.
ज्या वेळी दुष्काळाने लोक होरपळत होते. त्यावेळेला पिण्याच्या पाण्याच्या टाकी पासून ते लोकांच्या अन्नधान्यासाठी त्यांनी सहकार्य केलेले आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ताकद आहे. हे ओळखून अनेक जण त्यांच्याशी राजकीय मैत्री करत आहेत. हे स्वाभाविक आहे.
ज्या मतदारांनी पक्ष व व्यक्ती भेद विसरून त्यांच्या पाठीशी राहून स्वाभिमान दाखवलेले आहे. त्या स्वाभिमानी मतदारांची माजी आमदार घार्गे कधीही प्रकरणा करणार नाही. याची जाणीव राजकीय विश्लेषक व मतदारांना आहे.
आजच्या घडीला काहींची राजकीय घुसमट चाललेली आहे. त्या घुसमटीला वाट मोकळी करून देण्यासाठी माजी आमदार घार्गे यांच्याच नेतृत्व लोकांना हवी आहे. ज्यांना काही निवडणुकीमध्ये यश संपादन करता येत नाही.
निवडणूक म्हणजे लोकांना गृहीत धरणे हे ज्यांना वाटते त्यांना अंदाज बांधता येत नाही. त्यांनी राजकीयदृष्ट्या मोठ्या माणसांबद्दल बोलू नये. आगामी सर्वच निवडणुकीत जनता निर्णय घेण्यास सक्षम आहे. असे ही पवार आणि गोडसे यांनी सूचित केले आहे.