अजित जगताप
Satara सातारा : महात्मा फुले यांचा वारसा डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहु महाराजांनी चालविला. बुद्धानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनीच खऱ्या अर्थाने विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. ती शिकवण आत्मसात करणे हे देशहिताचे आहे, असे मत डॉ.प्रमोद फरांदे यांनी व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर परिसरातील सांस्कृतिक सभागृहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुलेयांची जयंती साजरी करण्यात आली. तेव्हा “महात्मा ज्योतिबा फुले आणि सत्याचे समग्र विचार” या विषयावर डॉ.फरांदे बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत होते.
डॉ. फरांदे म्हणाले…!
”महात्मा फुले यांची पत्रकारीताही समाजप्रबोधनपर होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनीही वृत्तपत्रामध्ये सामाजिक प्रश्नांवर वृत्तपत्रामध्ये लेखन केले होते. शिवजयंतीचे खरे श्रेय फुलेंनाच जाते.समता, स्वातंत्र्य,बंधुत्व,न्याय यासाठीच त्यांनी जीवन अर्पण केले होते. जातीय व्यवस्थेचा धोका हा मानव जातीच्या उन्नतीमध्ये अडथळा ठरत आहे. त्यामुळे जाती, वर्णभेदाविरोधातील महात्मा फुलेंचा वस्तुनिष्ठ आणि वैज्ञानिक दृष्टीकोन समजून घेणे गरजेचे आहे.
यावेळी डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास शोभा भंडारे व मेघा खंडाईत (गुडी) यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामुदायिक वंदना घेण्यात आली. फुले यांच्या प्रतिमेस फरांदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी समता सैनिकांनी मानवंदना दिली.
समता सैनिकांना ड्रेस कोड किटचे वाटप…!
फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे संरक्षण सचिव दिलीप एकनाथ फणसे यांच्याकडून समता सैनिक यांना ड्रेस कोड किटचे वाटप करणयात आले. बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांच्या हस्ते विकास तोडकर, शाहिर यशवंतराव भाले, किशोर गायकवाड, दिलीप सावंत, कल्पना कांबळे, द्राक्षा खंडकर व शोभा भंडारे आदींना किटचे वाटप करण्यात आले. कार्याध्यक्ष अरुण पोळ, सरचिटणीस संदीप कांबळे, सचिव रमेश इंजे व ऍड.विलास वहागावकर यांनी स्वागत केले. अरुण जावळे व जीवन मोहितें यांनी प्रास्ताविक केले.
जीवन मोहितें यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आबासाहेब दणाने यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Satara News : शिवसेनेच्या लेटर पॅड वर फडणवीस यांची छबी