लोणी काळभोर : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिकापदी संजीवनी शशिकांत बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कन्या प्रशालेच्या मावळत्या मुख्याध्यापिका निशा झिंजुरके सेवानिवृत्त झाल्यामुळे संजीवनी बोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे शिक्षण एमए बीएड असून १९८६ साली येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये त्यांनी नोकरीला सुरुवात केली होती. त्यांचे आईवडील दोघेही शिक्षक होते.
दरम्यान, बोरकर या गेली काही वर्षे भोर मधील गर्ल्स हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका म्हणून काम पहात होत्या. ज्या विद्यालयात शिक्षण घेतले त्याच विद्यालयात मुख्याध्यापक पदी काम करण्याची संधी त्यांंना मिळाली आहे. सामाजिक बांधलकी म्हणून कन्या प्रशालेच्या शैक्षणिक विकास व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार असून संस्थेचे कार्याध्यक्ष अभय कुमार साळुंखे व विभाग प्रमुख सीताराम गवळी यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याची माहिती संजीवनी बोरकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिली.