Sunday, November 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर तालुक्यात वाळू, माती अन् मुरूम माफिया ‘जोरात’; गौण खनिज माफियांना मदत करणारा तो अधिकारी कोण?

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 29 November 2026, 18:30

न्हावरे: घोड धरणातील वाळूचोरी, शासकीय गायरान जमिनीवरील बेकायदा वाळूसाठे आणि आलेगाव पागा, न्हावरे, उरळगाव,कोळगाव डोळस, आंधळगाव परिसरातील मुरूम-माती उत्खनन आणि बेसुमार अवैध वाहतूक अशा प्रकारे गौण खनिज चोरीच्या घटनांनी शिरूर तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चिंचणी (ता.शिरूर) येथील शासकीय गायरान जमिनीवरील वाळूसाठ्याची तक्रार होताच महसूल प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले; मात्र मंगळवारीच (ता.२४) दिवसभरात संपूर्ण वाळूसाठा गायब झाल्याचा आरोप निळे वादळ संघटनेने केला आहे. चौकशीचे आदेश निघाल्यानंतरच वाळूसाठा हलविण्यात आला असेल, तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का? आणि संबंधितांना याची माहिती आधीच मिळाली होती का? असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

चिंचणी येथील गट क्रमांक १२८, ७५ व ७६ या शासकीय गायरान जमिनीवर घोड धरणातून आणलेली वाळू साठविल्याची तक्रार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा दीपिका भालेराव यांनी केली होती. या प्रकरणी शासकीय फिर्यादीनुसार गायरान गट क्रमांक १२८ लगतच्या घोड धरणाच्या संपादित क्षेत्रात अंदाजे फक्त ११ ब्रास वाळूचा बेकायदा साठा आढळल्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परंतू, गुन्हा दाखल होऊनही वाळूचोरीच्या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश होणार का, हा खरा प्रश्न आहे.

निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी यांनी आपण चार दिवस रजेवर असल्याचे सांगत, तक्रारीची माहिती तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांना दिल्याचे स्पष्ट केले. तर निमोणेचे मंडळ अधिकारी नंदकुमार खरात यांनी बुधवारी (ता.२५) चिंचणी येथील वाळूसाठ्यावर कारवाई केल्याचे सांगितले. मात्र, चौकशीचे आदेश, वाळूसाठा गायब होण्याचा आरोप आणि त्यानंतरची कारवाई या घटनाक्रमाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे चिंचणी, शिंदोडी, आलेगाव पागा, न्हावरे, उरळगाव, कोळगाव डोळस आणि आंधळगाव परिसरातही वाळू, मुरूम व मातीच्या अवैध उत्खननाच्या तक्रारी आहेत. आलेगाव पागा व न्हावरे येथील गायरान आणि वनविभागाच्या जमिनीवरील मुरूम चोरीच्या प्रकरणांचे पुढे काय झाले? प्रत्यक्ष उत्खनन झालेल्या क्षेत्राबाबत पंचनाम्यांवर प्रश्न उपस्थित होत असताना त्याची स्वतंत्र चौकशी का होत नाही? असे सवाल पर्यावरणप्रेमी उपस्थित करीत आहेत.

दुसरीकडे, परराज्यांतून नंबर प्लेट नसलेल्या हायवा गाड्या, पोकलेन व जेसीबी आणून उत्खनन होत असल्याचे आरोप आहेत. मग या वाहनांवर कारवाई का होत नाही? गौण खनिज चोरांना नेमके अभय कोणाचे? महसूल यंत्रणेतील काही कर्मचारी अधिकाऱ्यांचे संबंधित माफियांशी संगनमत असल्याच्या चर्चांचीही चौकशी होणे गरजेचे आहे. अर्थात, या आरोपांची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक आहे.

गौण खनिज चोरीवर केवळ पंचनामे, गुन्हे आणि दिखाऊ कारवाया करून चालणार नाही. वाळू-मुरूम आणि माती चोरीची संपूर्ण साखळी, वाहनांचे मालक, उत्खनन करणारे आणि त्यांना मदत करणारे यांची नावे समोर आली पाहिजेत. महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतंत्र पथक नेमून शिरूर तालुक्यातील सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा शासनाचा महसूल बुडत राहणार आणि माफियांचेच साम्राज्य वाढत राहणार, अशी संतप्त प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिरूर तालुक्यात वाळू, माती अन् मुरूम माफिया ‘जोरात’; गौण खनिज माफियांना मदत करणारा तो अधिकारी कोण?

Sunday, 29 November 2026, 18:30

लोणी काळभोर येथे कंबरेला कोयता घेऊन फिरणारा तरुण जेरबंद

Sunday, 29 November 2026, 18:25

“आधार कार्डचा गैरवापर अन् २० तक्रारी…” भीती घालून लुटले ४५ लाख २० हजार रुपये; पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

Sunday, 29 November 2026, 17:37

Loni Kalbhor News : कदमवाकवस्तीत सजावटीची गाडी घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला ‘लग्नाच्या ठिकाणी येऊन मारून टाकण्याची धमकी’; गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 16:32

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा पुरस्कार सोहळा उद्या बालेवाडीत; मान्याचीवाडीला विभागात प्रथम क्रमांक

Sunday, 29 November 2026, 16:15

दौंड-सिद्धटेक मार्गावर भरधाव कार व दुचाकीला जोरदार धडक! दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू; उरुळी कांचन येथील कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Sunday, 29 November 2026, 15:43
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp