बारामती : राज्यातील ११ जागांवर आज लोकसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. अशातच बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस बंदोबस्तामध्ये पैसे वाट्ल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी रात्री यासंदर्भातील काही फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत. तसेच पैसे काढण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत बँक सुरु होती, असा दावा करणारा एक व्हिडीओ देखील रोहित पवारांनी पोस्ट केला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस…
यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय… यामध्ये भोर तालुक्यातील ‘अजितदादा मित्रमंडळा’चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसतायेत…
यासाठीच पाहीजे होती का ‘Y’ दर्जाची सुरक्षा? pic.twitter.com/TWZOOenx0V
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 6, 2024
या प्रकरणामध्ये रोहित पवार यांनी थेट अजित पवार गटाचा हात असल्याचा उल्लेख आपल्या पोस्टमध्ये केला आहे. ‘रात्री बारामतीत पैशांचा पाऊस पडला’ असा उल्लेखही या पोस्टमध्ये केला आहे. दरम्यान, या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिले आहे. तो त्यांचाच माणूस असू शकतो. त्यांच्या माणसाला पाठवून ते असे करु शकतात, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.
#PDCC बँकेच्या वेल्हे शाखेतील #घड्याळ बहुतेक बंद पडलंय….
आत्ता रात्रीचे 12 वाजले तरी बँक सुरू आहे… कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर #ओव्हर_टाईम सुरू असावा…निवडणूक आयोग दिसतंय ना?
सामान्य मतदार मात्र योग्यच निर्णय घेईल.@CEO_Maharashtra pic.twitter.com/3os8ALWv2v
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 6, 2024
काय म्हणाले रोहित पवार?
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेल्हे शाखेतील घड्याळ बहुतेक बंद पडलंय. आता रात्रीचे 12 वाजले तरी बँक सुरू आहे. कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर ओव्हर टाईम सुरू असावा. त्यानंतर रोहित पवार यांनी दुसरे ट्विट केले. बारामती मतदारसंघात चक्क पोलिस ‘बंदोबस्तात’ पडतोय पैशांचा पाऊस. यासंदर्भात भोर तालुक्यातील काही व्हिडिओ शेअर करतोय. यामध्ये भोर तालुक्यातील ‘अजितदादा मित्रमंडळा’चा पदाधिकारी आणि मावळमधील एका नेत्याचे कार्यकर्तेही दिसत आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.