Tuesday, June 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये कोयता फिरवत दहशत माजवणारा तडीपार गुन्हेगार रोहित पाटील पोलिसांच्या जाळ्यात

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 22 June 2026, 13:16

लोणी काळभोर, ता. २२ : पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या एका सराईत गुन्हेगाराने पुन्हा लोणी काळभोरमध्ये धुडगूस घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भररस्त्यात हातात लोखंडी कोयता घेऊन हवेत फिरवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी चित्रपटातील पाठलागाप्रमाणे कारवाई करत शिताफीने २० जूनला जेरबंद केले. पोलिसांच्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आरोपी रोहित महादेव पाटील (वय २२, रा. खोकलाई देवी चौक, ननवरे चाळ, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे, याप्रकरणी पोलीस अंमलदार दिपक अर्जुन गायकवाड यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जून रोजी रात्री बिट मार्शल कर्तव्यावर असताना पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाषाणकर गॅस एजन्सीजवळील सार्वजनिक रस्त्यावर एक तरुण हातात कोयता घेऊन नागरिकांना धमकावत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद जगताप यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच रोहित पाटील हा हातातील कोयता हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण करत असल्याचे दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून काही अंतरावर त्याला पकडले.

 

चौकशीत आरोपी हा पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून २३ ऑगस्ट २०२४ पासून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, तडीपार कालावधीत संबंधित हद्दीत प्रवेश करण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नसल्याची कबुली आरोपीने पोलिसांसमोर दिली. याप्रकरणी आरोपी रोहित पाटील याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, कलम ३७(१)(२)(३) सह १३५ तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्टच्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार महेश करे करत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पावसाळ्यातील सुदृढ आरोग्याचे रहस्य! तुमच्या ताटात असावी ही फळे आणि भाज्या; आजारांना म्हणा बाय-बाय!

Tuesday, 23 June 2026, 17:09

‘तु मला सोडून का गेला, तू असं का केलं?’ सियाची इंस्टाग्रामवरची भावनिक पोस्ट अन् व्हिडीओ व्हायरल; स्वतः खून केल्यानंतर रडारड, पहा व्हिडीओ…

Tuesday, 23 June 2026, 17:06

डाळिंब येथे चालकाचे नियंत्रण सुटले अन् मुरूम वाहणारा हायवा थेट जिल्हा परिषद शाळेत घुसला; पहा व्हिडीओ..

Tuesday, 23 June 2026, 16:54

शेतजमीन मालकांसाठी मोठी आनंदाची बातमी! आता शेतीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ ची कटकट कायमची संपली

Tuesday, 23 June 2026, 16:30

स्वस्त सोने खरेदी करण्याची शेवटची संधी? सोन्या-चांदीचे दर कोसळले; हिच खरेदीची योग्य वेळ

Tuesday, 23 June 2026, 16:29

विजय-त्रिशाच्या नात्याचा ‘द एंड’? विजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाही अन् इन्स्टाग्रामवरही केलं ‘अनफॉलो’

Tuesday, 23 June 2026, 16:16
Next Post

खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारी गाडी वनविभागाच्या जाळ्यात; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.