Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिक्षकांच्या कामाचा आढावा आता डिजिटल पद्धतीने! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, जिल्हानिहाय ‘विषय समित्या’ होणार स्थापन

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 25 July 2026, 8:47

पुणे: राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात विविध विषयांसाठी स्वतंत्र ‘विषय समित्या’ स्थापन केल्या जाणार आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबत सर्व जिल्ह्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी अद्याप अशा समित्या तयार झालेल्या नाहीत, त्यांनी तातडीने त्याची अंमलबजावणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 8 जुलै 2026 रोजी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे आणि अभ्यासातील कमतरता दूर करणे हा या समित्यांचा मुख्य उद्देश असणार आहे.

अलीकडे झालेल्या ‘परख’ सर्वेक्षणातून इयत्ता 6 वी आणि 9 वीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये काही अडचणी असल्याचे समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर आता 6 वी ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

 

या विषय समित्यांमध्ये अनुभवी, हुशार आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने काम करणाऱ्या शिक्षकांचा समावेश केला जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक उपक्रम राबवणे, विशेष चाचण्या घेणे, अभ्यासासाठी डिजिटल साहित्य तयार करणे आणि करिअर मार्गदर्शन करणे, अशी जबाबदारी या समित्यांवर सोपवण्यात येणार आहे.

या समित्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक समितीसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला जाईल. त्यामध्ये संबंधित अधिकारी, विषय तज्ज्ञ शिक्षक आणि विस्तार अधिकारी यांचा समावेश असेल. तसेच राज्यस्तरावर तयार होणाऱ्या विशेष गटात प्रत्येक तालुक्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या 5 शिक्षकांना सहभागी करून घेतले जाणार आहे.

माध्यमिक स्तरावर मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास आणि भूगोल या विषयांसाठी समित्या तयार केल्या जातील. तर उच्च माध्यमिक स्तरावर भाषा विषयांसह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, अकाउंटन्सी आणि वाणिज्य विषयांचा समावेश असेल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार; रॅलीपूर्वी संदीप देशपांडेंच्या टी-शर्टने वेधलं लक्ष, भाजपलाही टोला!

Sunday, 26 July 2026, 11:00

IT कंपनीत नोकरीचं स्वप्न पडलं महागात! मोबाईलवरील एका मेसेजनं पुण्यातील तरुणाला लाखोंचा गंडा

Sunday, 26 July 2026, 10:27

एकाच वेळी 70 विद्यार्थी आजारी; मळमळ, उलट्या अन् चक्कर… अमरावतीच्या आश्रमशाळेत नेमकं काय घडलं?

Sunday, 26 July 2026, 9:15

पुण्यातील गोळीबार प्रकरण भोवलं! गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,पोलीस आयुक्तांचा दणका

Sunday, 26 July 2026, 8:49

पुण्यात रोगराईचा कहर! डेंग्यूसह साथीच्या आजारांनी वाढवली चिंता; 5,500 हून अधिक रुग्ण

Sunday, 26 July 2026, 8:26

‘हे माझ्यासाठी मोठं दायित्व’ ; शिक्षणमंत्रीपदाची धुरा सांभाळताच प्रल्हाद जोशीचीं प्रतिक्रिया चर्चेत

Sunday, 26 July 2026, 7:57
Next Post

सरकारला 160 कोटींचा गंडा! बनावट शालार्थ आयडीद्वारे कोट्यवधींची लूट; माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.