Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सरकारला 160 कोटींचा गंडा! बनावट शालार्थ आयडीद्वारे कोट्यवधींची लूट; माजी शिक्षणाधिकाऱ्याला अटक

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 25 July 2026, 8:59

पुणे: राज्यातील शिक्षण विभागात मोठा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करून शासनाची 160 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (SIT) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात जळगावचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोणेकर (वय 66) यांना धुळ्यातून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

एसआयटीच्या तपासात या प्रकरणातील अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. हिंगोणेकर यांनी 2022 ते 2025 या काळात जळगाव येथे शिक्षणाधिकारी म्हणून काम करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. कोणतीही आवश्यक कागदपत्रे आणि अधिकृत प्रक्रिया पूर्ण न करता त्यांनी 259 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने वैयक्तिक मान्यता दिल्याचे तपासात आढळून आले आहे.

त्यानंतर या कर्मचाऱ्यांची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये चुकीच्या पद्धतीने नोंदवण्यात आली. या बनावट नोंदींच्या आधारे वेतन आणि इतर आर्थिक लाभ देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे शासनाच्या मोठ्या निधीचे नुकसान झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

नाशिक विभागातील जळगाव, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे. तपासानुसार, 842 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या मागील तारखांपासून दाखवण्यात आल्याचा संशय आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे शासनाचे 160 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्यात काही संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि इतर संबंधित अधिकारी सहभागी असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.

एसआयटीचा तपास पुढे जात असून, आतापर्यंत या प्रकरणात सुमारे 1200 जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. माजी शिक्षणाधिकाऱ्याच्या अटकेनंतर शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून, आगामी काळात आणखी काही व्यक्तींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

फुरसुंगीतील विजेच्या समस्या सुटता सुटेनात अन् लोणी काळभोरला पूर्णवेळ वीज भेटेना!

Sunday, 25 October 2026, 21:31

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे आता होणार अधिक कठीण! उत्तीर्ण होण्यासाठी ६० ऐवजी थेट ‘एवढे’ टक्के गुण अनिवार्य

Sunday, 25 October 2026, 21:19

पुण्यात ‘भाईगिरी’चा खळबळजनक प्रकार! ‘आज याला जिवंत सोडायचे नाही’ म्हणत १६ वर्षीय मुलावर कोयत्याने भीषण वार

Sunday, 25 October 2026, 21:13

बारामतीत लाचलुचपत विभागाची धडक कारवाई; ६ हजारांची लाच घेताना वनपाल रंगेहात जाळ्यात

Sunday, 25 October 2026, 20:02

इंदापूरच्या भक्ती बोराटेची भरारी! ४०० मीटर हर्डल्समध्ये जिल्ह्यात प्रथम; विभागीय स्पर्धेसाठी निवड

Sunday, 25 October 2026, 19:51

पोलीस चौकशीला घाबरून राणा सूर्यवंशीने रुग्णालयातून ठोकली धूम? पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार; पोलिसांच्याकडून तोंडावर बोट..

Sunday, 25 October 2026, 19:46
Next Post

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! दरात मोठी घसरण, पाहा नवीन रेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp