पुरंदर : पुरंदर तालुका भाजपा सरचिटणीस बाळासाहेब भोसले यांची मोठी कन्या रेवती बाळासाहेब भोसले यांची दुसऱ्या प्रयत्न निवड झाल्याचा निकाल १ ऑगस्ट रोजी समजला. पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य गंगारामदादा जगदाळे व नारायणपूरच्या दत्त मंदिराचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर यांच्या हस्ते रेवती यांचे अभिनंदन करण्यात आले. वकील शिवाजी कोलते, ग्राहक संघाचे रामदास मेमाणे, भाजपा नेते योगेंद्र माने, बाळासाहेब भोसले आदी उपस्थित होते.
रेवती भोसले हिचे प्राथमिक शिक्षण नीरा शिव तक्रार येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. दहावीचे शिक्षण विद्या मंदिर तर पुढील शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये बीसीएसमधून पूर्ण केले. त्यानंतर तिने लोकसेवा आयोगाचे परीक्षा दिली पण त्यात यश आले नाही. पुढे तिने निश्चय केला की आता एकदा या परीक्षेला सामोरे जायचे. पुन्हा जिद्दीने अभ्यासाला लागून रोज 14 तास अभ्यास करायचा. यामध्ये रयत प्रबोधिनीचे उमेश कुदळे, कोल्हापूरचे सरदार डिस्टन संदीप नवले यांचे मार्गदर्शन मला लाभले त्यामुळे या परीक्षेत यश मिळाले असल्याचे रेवती भोसले यांनी सांगितले.
1 ऑगस्टला उपनिरीक्षक पदी निवड झाल्याचे समजल्यानंतर रेवती भोसले यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. तालुक्यातून विविध मान्यवरांच्या माध्यमातून सत्कार आणि कौतुक रेवती यांचे कौतुक होऊ लागले आहे. असे वडील बाळासाहेब भोसले यांनी सांगितले.