Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘डोंगरावर फिरू दिले नाही’चा राग; वाघोलीतील तिवारी साइटवर वॉचमनवर टोळक्याचा जीवघेणा हल्ला, सात जणांवर गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 13 July 2026, 18:05

पुणे, ता. १३ : डोंगरावर फिरण्यासाठी प्रवेश नाकारल्याचा राग मनात धरून सात जणांच्या टोळक्याने वॉचमनवर दगड, लाकडी दांडका आणि प्लास्टिकच्या पाण्याच्या जारने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना वाघोली येथील तिवारी प्रॉपर्टीजच्या साइटवर रविवारी (१२ जुलै) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात वॉचमन गंभीर जखमी झाला असून, हल्लेखोरांनी “पोलिसांना नाव सांगितले तर याद राख” अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला.

साहील भालेकर, इम्रान जावेद शेख, ओम भालेकर, मोन्या पांचाळ, दादया धनवटे, ‘जित्या’ आणि आणखी एका अनोळखी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संदीप रामेश्वर यादव (वय ३४) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यादव हे वाघोलीतील भावडी चार परिसरात राहतात आणि विवेक तिवारी यांच्या तिवारी प्रॉपर्टीज साइटवर वॉचमन म्हणून काम करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी इम्रान जावेद शेख व त्याच्या मित्रांना साइटवरील डोंगरावर फिरण्यासाठी जाण्यास मज्जाव केल्याने दोन्ही पक्षांत वाद झाला होता.

संदीप यादव साइटवरील बॅरिकेटजवळ ड्युटीवर असताना मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या सहकारी वॉचमनने त्यांना बोलावून घेतले. त्याचवेळी साहील भालेकर, इम्रान जावेद शेख, ओम भालेकर, मोन्या पांचाळ, दादया धनवटे, ‘जित्या’ आणि आणखी एका अनोळखी व्यक्तीने तेथे येत जुन्या वादाचा राग काढत शिवीगाळ सुरू केली.

यानंतर टोळक्याने संदीप यादव यांच्यावर तुफान हल्ला चढवला. आरोपींनी दगड, लाकडी दांडका आणि प्लास्टिकच्या पाण्याच्या जारने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. परिस्थिती गंभीर झाल्याने इतर दोन वॉचमन घटनास्थळावरून जीव वाचवण्यासाठी पळून गेले. मारहाणीनंतर आरोपींनी “पोलिसांत तक्रार केली तर परिणाम भोगावे लागतील” अशी धमकी देत तेथून पलायन केले. या प्रकरणी संदीप यादव यांनी संबंधित सात जणांविरुद्ध वाघोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कृषी विभागाचा मोठा निर्णय! शेतकरी नुकसान भरपाईच्या नियमांत मोठा बदल; पंचनाम्यावर शेतकऱ्याची सही अनिवार्य

Tuesday, 29 September 2026, 18:03

ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद! तुमच्या राज्यात किती दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प? जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Tuesday, 29 September 2026, 17:57

मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी; वाचा सविस्तर

Tuesday, 29 September 2026, 17:19

सचिन वाझेंना दिलासा! मनसुख हिरेन हत्या अन् अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटी शर्थीसह जामीन मंजूर

Tuesday, 29 September 2026, 17:18

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा खुलासा! सोशल मीडिया अन् Google Searchवरून रचला कट; चार्जशीटमधून धक्कादायक माहिती समोर

Tuesday, 29 September 2026, 16:55

लोणी काळभोर सोसायटीची 109 वी सर्वसाधारण सभा उत्साहात

Tuesday, 29 September 2026, 16:51
Next Post

तुकाराम मुंढे यांचे कडक निर्देश! शाळांना आता पाळावे लागणार 'हे' कडक अन्नसुरक्षा नियम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp