अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील निर्वी येथे पिकप जीपमधून कत्तल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या पंचवीस गायींच्या वासराची सुटका शिरूर पोलिसांनी केली आहे. ही कारवाई 8 सप्टेंबर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास केली आहे. आरोपींकडून जीपसह वासरे असा ४ लाख २५ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर अज्ञात पीकप चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पांडुरंग दत्तात्रय बागुल पोलीस कॉन्स्टेबल शिरूर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्वी-शिरूर रोडवर पिकअपमध्ये (एम एच 12 पी एफ 9813) 25 जनावरांची वासरे वाहतुकीचा परवाना नसतानाही वासरे क्रूरपणे दाटीवाटीने कोंबुन भरले. तसेच जनावरांची वाहतुकीपुर्वी वैदयकीय तपासणी न करता घेवुन जात होते. त्यावेळी समोर पोलिसांची गाडी पाहताच पिकअपमधून अंधाराचा फायदा घेवुन चालकाने पळ काढला.
याप्रकरणी अज्ञात पिकअप चालकाविरूद्ध प्राण्यांना क्रूर वागविणे अधिनियम 1960 चे कलम 11(1), ग, ड,ज, मो.वा.का. कलम 66/192,134/177 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मोरे करीत आहे.