दौंड : दौंड तालुक्यातील विविध अंगणवाड्यामध्ये अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. 23 जुलै रोजी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अखेरची मुदत होती. ही अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रिया महीला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयात नमूद शैशणिक गुणवत्तेच्या आधारे करण्यात येणार असून ज्या उमेदवारास जास्त गुण अशाच महिलांची निवड केली जाणार असल्याचे कळविले होते. त्यासाठी स्थानीक विधवा महिला यांना प्राधान्य असेल. यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत. परंतु या भरती प्रक्रियेत वशिलेबाजी, आर्थिक देवाण घेवाण, राजकिय हस्तक्षेप होणार असल्याबाबत चर्चा ऐकण्यात येत आहेत.
यामुळे गरजू आणि पात्र महिलांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ नये, नियमाचे उल्लखन करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी. त्यांची कुठल्याही प्रकारे गय करू नये असे मत सर्वसामान्य महिला वर्ग यांच्यातून समोर येत आहे. ही भरती प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारे होणार का? यासाठी आपण कोणत्या कंपनीला कंत्राट देणार ?यासंदर्भात दौंड पंचायत समितीचे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी ॲड. कुणाल धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले नाही.
महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये पेपर फुटी तसेच वशिलेबाजी, आर्थिक देवाण -घेवाण यामुळें महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये लाखो बरोजगार तरुणांचे भविष्य पणाला लागले आहे. महाराष्ट्रातही अनेक सरकारी पदांच्या भरतीमध्ये पेपर फुटीने परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे मुलांनी वर्षभरात केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले आहे. पेपर फुटी का रोखता येत नाही? कायदा अपुरा की सरकारच गंभीर नाही ?
तरुणांनी सरकारी नोकरीच्या आशेवर अनेक वर्षे अभ्यास करायचा, काही लोकांच्या स्वार्थीवृत्तीने ‘पेपर लीक’ होण्याची शिक्षा देशाभरातील होतकरू तरुणांना मिळत आहे. त्यांच्या परीक्षा रद्द होऊन पुन्हा दुसऱ्या परीक्षेची वाट पाहणे नशिबात उरत आहे. त्यामुळे अनेक तरुणांचे नोकरीचे वय उलटत आहे. काही तरुण आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. त्यासाठी या अंगणवाडी भरती प्रक्रियेत पारदर्शकता असावी. गुणवत्तेच्या आधारे उमेदवाराची निवड झाली पाहिजे. तसे काही गैर आढळल्यास आमच्याशी संपर्क साधा त्या संबधिताची गय केली जाणार नाही.
संजय थोरात – अध्यक्ष अखील भारतीय मराठा महासंघ दौंड