Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ranjangaon News: बिबट्याच्या हल्ल्यामुळे शाळांच्या वेळेत बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 23 November 2025, 15:08

पोपट पाचंगे

 

रांजणगाव: पुणे (Ranjangaon News) जिल्ह्यातील शिरुर, आंबेगाव, खेड आणि जुन्नर या तालुक्यांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून या भागातील शाळांच्या वेळा बदलण्याचा आदेश देण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थी सुरक्षित राहतील.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या संदर्भात आदेश काढला आहे. यानुसार, बिबटप्रवण क्षेत्रातील शाळांची वेळ सकाळी 9.30 ते दुपारी 4 (साडेनऊ ते चार) अशी बदलण्यात आली आहे. संबंधित शाळांनी व्यवस्थापन समिती आणि शाळा समितीची मंजुरी घेऊन या वेळेत बदल करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. बिबट्याचे वाढते हल्ले लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

जिल्ह्यात सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये  बहुतांश विद्यार्थी पायी शाळेत जातात. रस्त्याच्या कडेने बिबटप्रवण आपत्ती क्षेत्र, ऊस क्षेत्र, डोंगराळ आणि जंगल क्षेत्र असल्याने बिबट्याच्या हल्ल्यांचा धोका अधिक आहे. सध्या ऊसतोडणी सुरू असल्याने उसाचे क्षेत्र कमी होत आहे, ज्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे येत आहेत आणि हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, हिवाळा ऋतूमुळे संध्याकाळी लवकर अंधार पडतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येत होती.

जिल्ह्यातील विशेषतः शिरुर, आंबेगाव,जुन्नर व खेड तालुक्यातील बहुतांश गावात सध्या बिबटयाचा वावर वाढलेला आहे. त्यातच प्रशासनाने शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांसह शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
-पोपट पाचंगे, रांजणगाव गणपती.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Mobile use in summer

Mobile use in summer : उन्हाळ्यात तासनतास मोबाईल स्क्रोल करताय? आरोग्यावर होतील ‘हे’ गंभीर परिणाम.

Wednesday, 1 April 2026, 20:42
Next Post

Bhigwan News: भिगवण-बारामती मार्गावर मध्यरात्री भीषण अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.