Good News : लोणी काळभोर, (पुणे) ; एकात्मिक बालविकास सेवा योजना, पंचायत समिती हवेली यांच्या वतीने अंगणवाडी मदतनीस पदावरून ‘अंगणवाडी सेविका’ पदी पदोन्नती मिळालेल्या भगिनींचा विशेष अभिनंदन व सन्मानपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांच्या शुभहस्ते या नवनियुक्त सेविकांना नियुक्ती पत्रे देऊन गौरविण्यात आले. Good News
शासन निर्णयानुसार, हवेली तालुक्यात कार्यरत असलेल्या मदतनीसांपैकी ज्यांच्याकडे 12 वी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता आणि किमान 2 वर्षांचा अनुभव आहे, अशा पात्र 7 मदतनीसांची अंगणवाडी सेविका पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तांत्रिक आणि बौद्धिक क्षमतेचा वापर करून या भगिनी उत्कृष्ट कार्य करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. Good News
याप्रसंगी बोलताना सभापती युवराज काकडे म्हणाले की, “मदतनीस म्हणून काम करताना या भगिनींनी अतिशय मेहनतीने आणि निष्ठेने योगदान दिले आहे. भविष्यात रचनात्मक समाज निर्मितीच्या कार्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरेल.” तसेच, अंगणवाडीत शिकणाऱ्या लहान बालकांना पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. Good News
यावेळी हवेली विभागाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी निलम भुमकर, उरुळी कांचन विभागाचे बालविकास प्रकल्प अधिकारी अक्षय नजन, हवेलीच्या सहाय्यक बालविकास प्रकल्प अधिकारी स्वाती पाठक, पर्यवेक्षिका मीरा टेकवडे, पर्यवेक्षिका रुपाली जगताप, कनिष्ठ सहाय्यक लालपोतू मॅडम, थेऊरचे माजी ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ कोळेकर, दत्तात्रय कोळेकर व सर्व पदोन्नती झालेल्या अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. Good News





