लोणी काळभोर, ता.13 : आळंदी म्हातोबाची (ता.हवेली) रेल्वे स्थानकावर माथेफिरूकडून रेल्वेवर दगडफेक केल्याची घटना घडली बुधवारी (ता.12) मध्यरात्री घडली आहे. दगडफेक रोखण्यासाठी गेलेल्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराच्या डोक्यात दगड मारला आहे. तर दुसऱ्या एका अंमलदाराच्या डोक्यात फोडली फरशी फोडली आहे. परंतु, त्यांच्या डोक्यात हेल्मेट असल्याने दुर्घटना टळली आहे. परंतु, या हल्ल्यात डोक्यात दगड लागल्याने पोलिस हवालदार गंभीर जखमी झाले आहेत.

प्रदीप गाडे असे जखमी झालेल्या पोलिस हवालदाराचे नाव असून त्यांच्यावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी म्हातोबाची येथील रेल्वे स्थानकावर नग्न माथेफिरू रेल्वेवर दगड मारत आहे असा कंट्रोल ला कॉल आला होता. कॉल प्राप्त झाल्यानंतर बीट मार्शल दीपक गायकवाड व पोलीस हवालदार प्रदीप गाडे आळंदी म्हातोबाची रेल्वे स्थानकावर धाव घेतली. त्यानंतर संबंधित माथेफिरूला दगडफेक करू नका असे सांगितले. परंतु माथेफिरूने थेट पोलीस हवालदार प्रदीप गाडी यांच्यावर दगडाने हल्ला सुरू केला. या हल्ल्यात प्रदीप गाडे यांच्या डोक्याला दगड लागला. तर त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अंमलदार दीपक गायकवाड यांच्या डोक्यात फरशी फोडली. सुदैवाने पोलिस अंमलदार दीपक गायकवाड यांच्या डोक्यात हेल्मेट असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

दरम्यान, डोक्यातून रक्तस्राव होत असतानाही प्रदीप गाडे व दीपक गायकवाड यांनी त्या माथेफिरूला ताब्यात घेतले. त्यानंतर तेथेच चोप दिला. आणि लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर जखमी झालेले पोलीस हवालदार गाडीही लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल झाली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती मिळत आहे. तर संबंधित माथेफिरू हा परप्रांतीय असून त्याचे नाव व पत्ता अद्याप समजू शकलेले नाही.







