पुणे : राज्यात रामोशी, बेरड, बेडर हया समाजाची लोकसंख्या ८० लाखा पेक्षा जास्त असून हा समाज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या मागास असून या समाजाला न्याय मिळावा यासाठी युवा समाजसेवक डॉ. भाऊसाहेब शिंदे हे मैदानात उतारले आहे. राज्यातील क्रांतिकारी बेरड, बेडर, रामोशी समाज हा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या मागास आहे.
या समाजाचा अनुसूचित, जमातीमध्ये समावेश करण्यात यावा तसेच देशाचे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची शासकीय जयंती दिल्ली येथील संसद भवनात ७ सप्टेंबर ला साजरी करावी. रामोशी, बेरड, बेडर समाजाचे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापन राज्यसरकारने केली असून त्या महामंडळाचा रामोशी, बेरड, बेडर व्यक्तीला करण्यात यावा, तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या पहिले ८० लाखा पेक्षा जास्त रामोशी, बेरड, बेडर समाज असताना देखील आजपर्यंत रामोशी, बेरड बेडर समाजातील व्यक्तिला राजकीय दृष्ट्या मागास ठेवण्यात आले असून राज्य सरकारने तात्काळ रामोशी बेरड बेडर समाजाच्या व्यक्तीला विधान परिषदेवर संधी द्यावी. अशा मागण्या युवा सम अध्यक्ष समाजजसेवक भाऊसाहेब शिंदे यांनी राज्याचे समाजाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीकडे केली आहे.
या मागण्यांसंदर्भात राज्यसरकारने १५ दिवसात तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली होती. तसेच पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची भाऊसाहेब शिंदे यांनी भेट घेऊन निवेदन दिले. याची जिल्हाधिकारी यांनी गंभीर दखल घेऊन राज्य सरकारला तात्काळ कळवले असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबधित विभागास कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.