Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी रमेश भोसले; उपाध्यक्षपदी राजश्री काळभोर यांची बिनविरोध निवड

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 11 August 2026, 15:01

लोणी काळभोर, ता. ११ : हवेली तालुक्यातील प्रमुख आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी रमेश यशवंतराव भोसले, तर उपाध्यक्षपदी राजश्री उदय काळभोर यांची बिनविरोध निवड झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडीकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष गुरुदेव काळभोर आणि उपाध्यक्ष अमोल कोळपे यांनी कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी (ता. ११) संस्थेच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. सहकार विभागाचे सहाय्यक सहकारी अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी तळपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणूक प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी रमेश भोसले, तर उपाध्यक्षपदासाठी राजश्री काळभोर यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाले. त्यामुळे दोन्ही पदांसाठी निवडणूक न घेता तळपे यांनी रमेश भोसले आणि राजश्री काळभोर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर माजी सभापती दिलीप काळभोर, जिल्हा परिषद सदस्य शीतल कांबळे, लोणी काळभोरचे प्रशासक सरपंच नागेश काळभोर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड , यशवंत कारखान्याच्या उपाध्यक्ष रत्नाताई काळभोर, साधना बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष आप्पा काळभोर, सुभाष नरसिंह काळभोर, अंबरनाथ देवस्थान कमिटी अध्यक्ष हेमंत गायकवाड, संस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब काळभोर, विठ्ठल काळभोर, प्रताप बोरकर, ज्ञानेश्वर काळभोर, माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर, राजेंद्र काळभोर, शिवसेनेचे लोणी काळभोर शहरप्रमुख संतोष भोसले यांच्यासह संस्थेचे सभासद व मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या हितासाठी शंभर वर्षांची वाटचाल
लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची स्थापना सन १९१७ मध्ये झाली असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संस्थेच्या माध्यमातून पीककर्ज, विविध प्रकारचे कर्जवाटप तसेच रासायनिक खतांची विक्री आदी सेवा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. विशेष म्हणजे, संस्थेची निवडणूक प्रक्रिया तब्बल ५० वर्षांनंतरही बिनविरोध पार पडली असून, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडही बिनविरोध करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडीला राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

‘कारभार पारदर्शक ठेवणार’ — रमेश भोसले

“संस्थेचा कारभार आगामी काळात पूर्णपणे पारदर्शक ठेवण्यास प्राधान्य देणार आहे. शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज उपलब्ध करून देणे, मध्यम मुदत कर्जवाटप सुरू करणे तसेच कर्जाची परतफेड पूर्ण केलेल्या सभासदांना पुन्हा कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. संचालक मंडळ आणि सर्व सभासदांना विश्वासात घेऊन संस्थेचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा प्रयत्न राहील.” असे नवनिर्वाचित अध्यक्ष रमेश भोसले यांनी दैनिक पुणे प्राईम न्यूजशी बोलताना दंगीतले आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

DJविरोधाची किंमत मोजावी लागणार? विद्यानंद बापटांविरोधात हिंदू सेवा संघ मैदानात,थेट घेतला मोठा निर्णय!

Friday, 11 September 2026, 12:34

सामाजिक चळवळीतील लढवय्या कार्यकर्ती स्मिता नॉर्टन यांचे निधन

Friday, 11 September 2026, 12:04

इंदापूर-बारामती मार्गावर आता ‘ई-शिवाई’चा प्रवास; प्रवाशानां मोठा दिलासा

Friday, 11 September 2026, 11:33

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? पनीर -खवा तपासण्यासाठी FDA चे पथक बुधवार पेठेत दाखल, प्रशासन अलर्ट

Friday, 11 September 2026, 11:11

पुणेकरांनो, रविवारी रेल्वे प्रवास करताय? थांबा! स्टेशनवर 9 तासांचा मेगाब्लॉक; डेक्कनसह ‘या’ गाड्या रद्द

Friday, 11 September 2026, 10:43

शिरूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक; अनेक गावांचा कारभार एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर!

Friday, 11 September 2026, 10:23
Next Post

आषाढ अमावस्येला चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी! दीपपूजनाआधी हे नियम जाणून घ्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp