पुणे : पुणे- सातारा मार्गावरील नीरा-लोणंद आणि वाल्हे- नीरा रेल्वे फाटक क्रमांक ३३, ३४ आणि ३६ हे ट्रॅक चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. दुहेरीकरणाच्या कामामुळं १३, १४, १५ आणि १६ डिसेंबर असं चार दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
यामध्ये नीरा- लोणंद रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे किमी ८६/६-७ येथील रेल्वे फाटक क्रमांक ३३ हे बुधवारी १३ डिसेंबरला सकाळी ८ ते गुरुवारी १४ डिसेंबरला सकाळी ८ वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
तर नीरा- लोणंद रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे किमी ८६/७-८ येथील रेल्वे फाटक संख्या ३४ गुरुवारी १४ डिसेंबरला सकाळी ८ ते शुक्रवारी १५ डिसेंबरला सकाळी ८ वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
तसेच वाल्हे- नीरा रेल्वे स्टेशन दरम्यान रेल्वे किमी ८८/३-४ येथील रेल्वे फाटक क्र. ३६ शुक्रवारी १५ डिसेंबरला सकाळी ८ ते शनिवारी १६ डिसेंबरला सकाळी ८ वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.