पुणे – महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक आगोदरपासून त्रस्त असताना आता वाहनचालकांना महागाईचा फटका बसणार आहे. मध्यरात्रीपासून पुणे ग्रामीण मध्ये सीएनजी चे दर दोन रुपयांनी वाढले आहेत . त्यामुळे CNG गॅससाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. यामुळे आता रिक्षा आणि टॅक्सी चालक भाडेवाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता आणखी एक झळ बसणार आहे.
पुणे ग्रामीण मध्ये सीएनजी चे दर हे 85 रुपयांवरून आता 87 रूपयांवर पोहचले आहेत. दोन रूपयांच्या दर वाढीने वाहन चालकांच्या खिशाला महागाईची झळ बसणार आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच 18 जुलैपासून GSTवाढल्याने सर्वसामन्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.