Saturday, June 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

थेऊर फाटा येथील एका हार्डवेअर दुकानात अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण झाल्याचा व्हिडीओ ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती; नायगाव अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणाला नवीन ट्विस्ट.

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 28 May 2026, 14:13

लोणी काळभोर, ता. २८ : नायगाव फाटा येथून बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. बेपत्ता होण्यापूर्वी संबंधित मुलाला कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा परिसरातील एका हार्डवेअर दुकानात अमानुषपणे बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या मारहाणीचा व्हिडिओ ‘पुणे प्राईम न्यूज’च्या हाती लागला आहे. या व्हिडिओमध्ये अल्पवयीन मुलगा जीवाच्या आकांताने ओरडत असतानाही हार्डवेअर चालक त्याला काठीने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

पियुष संदीप शिंदे (वय १६ वर्षे १० महिने) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. विशेष म्हणजे, हा मुलगा मागील सहा दिवसांपासून बेपत्ता असून, त्याच्या अपहरणाचा गुन्हा उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याआधी त्याच्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेने संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पियुष शिंदे हा दोन महिन्यांपूर्वी थेऊर फाटा येथील एका राजस्थानी व्यक्तीच्या हार्डवेअर दुकानात काम करत होता. नंतर त्याने ते काम सोडले होते. काही दिवसांपूर्वी तो पुन्हा परिसरात दिसल्यानंतर संबंधित हार्डवेअर चालकाने त्याला दुकानात बोलावून घेतले. दुकानातील गोमातेसाठी ठेवलेल्या दोन दानपेट्यांमधील रोकड चोरी केल्याचा संशय घेत त्याच्यावर चौकशीच्या नावाखाली अमानुष अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या इंस्टाच्या पोस्टवर क्लिक करा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

व्हिडिओमध्ये संबंधित अल्पवयीन मुलगा “मी चोरी केली नाही” असे सांगत विनवण्या करताना दिसत आहे. मात्र, तरीही हार्डवेअर चालक त्याला निर्दयीपणे मारहाण करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे “कायदा हातात घेण्याचा अधिकार या व्यक्तीला कोणी दिला?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जर खरंच चोरीचा संशय होता तर संबंधित हार्डवेअर चालकाने थेट पोलीस ठाण्यात तक्रार का दिली नाही? पोलिसांऐवजी स्वतःच न्यायालय बनून अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करण्यामागे नेमका उद्देश काय होता? तसेच या गंभीर प्रकारानंतरही पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई का केली नाही? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.

दरम्यान, पियुष शिंदे याच्या वडिलांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, मुलाच्या डोक्यावर जुन्या जखमेची खूण असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे व्हिडिओतील मारहाणीमध्येच त्याला गंभीर दुखापत झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, मारहाणीच्या घटनेनंतरच पियुष बेपत्ता झाल्याने या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध असू शकतो, अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.

अल्पवयीन मुलगा सहा दिवसांपासून बेपत्ता असताना पोलीस प्रशासनाने अद्याप ठोस तपासाची दिशा का घेतली नाही? हार्डवेअर चालकाची सखोल चौकशी झाली का? व्हिडिओ समोर आल्यानंतरही आरोपींवर कठोर कारवाई होणार का? असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित हार्डवेअर चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच बेपत्ता मुलाचा तातडीने शोध लावावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

चौफुला परिसरात पिस्तुलाचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या उरुळी कांचनच्या दोघांना यवत पोलिसांनी केले जेरबंद..

Saturday, 13 June 2026, 19:13

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचा इशारा! उद्या पुणे स्टेशनवर 9 तासांचा तांत्रिक ब्लॉक; या गाड्या रद्द

Saturday, 13 June 2026, 19:01

पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा! भूसंपादनासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; 70 टक्के शेतकऱ्यांची संमती

Saturday, 13 June 2026, 18:13

प्लास्टिकच्या एक किलो कचऱ्याच्या बदल्यात ‘साखर’ तर विद्यार्थ्यांना मिळणार ‘शालेय वस्तू; उरुळी कांचनमध्ये ‘ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन’चा अनोखा पॅटर्न

Saturday, 13 June 2026, 17:42

सक्षमचं घर का सोडलं? खरं कारण सांगत आंचलचा सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप; म्हणाली “लहान भाऊ माझ्याशी गैरवर्तन…..

Saturday, 13 June 2026, 17:37

जन्मदात्रीनेच घेतला जीव! चार मुलांना विष पाजून आईने संपवली जीवनयात्रा; तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Saturday, 13 June 2026, 16:36
Next Post

सोन्याच्या दरात घसरण! खरेदीसाठी सुवर्णसंधी; आजचे दर जाणून घ्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.