पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या (Pune News) ‘अमेडिया एन्टरप्रायझेस एलएलपी’ (Amedia Enterprises LLP) या कंपनीशी संबंधित जमीन गैरव्यवहारावरून पुणे शहरात राजकीय खळबळ माजली आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन पोलिस ठाण्यात अनेकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर, राजकीय चर्चांना उधाण आले होते.

मुंढवा आणि बोपोडी प्रकरणे वेगवेगळी
पुणे पोलिसांनी पुढे सांगितले की, मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण आणि बोपोडी जमीन व्यवहार प्रकरण हे वेगळे असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे. ‘अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी’ या कंपनीचे नाव कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात समोर आले आहे. बोपोडी जमिन व्यवहाराशी पार्थ पवार यांचा काहीसंबंध नाही. 2 वेगवेगळ्या जमीन व्यवहाराची एकत्र तक्रार दाखल केल्याने गैरसमज झाल्याचे समोर आले आहे.
बोपोडी जमीन प्रकरणात पोलिसांचा खुलासा
या वादग्रस्त जमीन व्यवहारावर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन जमीन गैरव्यवहार प्रकरणाबद्दल मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी स्पष्ट केले की, बोपोडी येथील जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्या कंपनीचा आणि शीतल तेजवानी यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचे म्हंटले आहे. निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांनी पवार कुटुंबाला चांगलेच घेरले असून, याचा निवडणूक निकालावर काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






