पुणे : Pune News – पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. पुण्यात दिवसभरात काहीना काह घडामोडी घडतच असतात. शाब्दीक वादात तर पुणेकरांचा हात कोणी धरणारच नाही. कधी रस्त्यात थेट गाडी आडवी लावून वाद घातला जातो. तर कधी गाडीवर बसला म्हणूनही वाद होतच असतात. तसेच पुण्यातील (Pune News) वाहतूकीचा बोजवारा उडाला असल्याने घरातून बाहेर पडलेला व्यक्ती हा वैतागलेलाच असतो. पीएमपीने प्रवास करणाऱ्यांची तर वेगळीच तऱ्हा असते. तिकीटाच्या पैशांवरुन होणारे वाद तर नित्याचेच झाले आहेत. असाच एक वाद प्रवासी आणि वाहका मध्ये झाला आहे. (Pune News)
इतर प्रवाशांना ताटकळत बसावे लागले
पीएमपी बसचे वाहक (कंडक्टर) आणि प्रवशाचा आपसात वाद झाला. हा वाद मिटेना म्हणून चालकाने थेट पोलिस ठाण्यात बस नेल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे इतर प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. ही घटना सकाळी मोशी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रवशाने मोशीपर्यंतचे पंधरा रुपयांचे तिकीट काढले. त्यानंतर त्याने पुन्हा एक दिवसाचा पन्नास रुपयांचा पास मागितला. मात्र, गैरसमजातून कंडक्टरने पुन्हा मोशीपर्यंतचे तिकीट दिले. या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारी पर्यंत गेले. शेवटी भांडण मिटत नसल्याचं पाहून चालकाने बस मोशी पोलीस चौकीत नेली. तेथे पोलीस उपस्थित नसल्याने शेवटी बस भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आली. त्यामुळे अन्य प्रवाशांना तासाभर ताटकळत बसावे लागले.