Pune News : पुणे : प्रवासी मोटारी भाड्याने देणाऱ्या एका कंपनीच्या ॲपवर नोंदणी केल्यानंतर मोटारी भाडेतत्वावर उपलब्ध करुन देण्यात येतात. या मोटारी चोरुन राजस्थानात पाकिस्तानी सीमेजवळील गावात विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी मध्यप्रदेशमधून अटक केली. त्याच्याकडून ६० लाख रुपयांच्या तीन मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपीचे साथीदार पसार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. (Pune News)
गुन्हा दाखल करण्यात आला
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुफियान चौहान (वय १९, रा. फतेहगंज, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रवासासाठी लागणाऱ्या मोटारी भाड्याने देणाऱ्या कंपनीच्या ॲपवर नोंदणी केल्यानंतर मोटारी भाडेतत्वावर उपलब्ध करुन देण्यात येतात. या कंपनीच्या ॲपवर चौहान आणि साथीदारांनी नोंदणी करुन मोटारी भाडेतत्वावर घेतल्या होत्या. चौहान याने ॲपवर नोंदणीसाठी साथीदारांची ओळखपत्रे दिली होती. स्वतः चौहानने महागडी मोटार भाडेतत्त्वावर घेतली होती. मोटार घेऊन तो फरार झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्याविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Pune News)
दरम्यान, या प्रकरणाचा तपास चंदननगर पोलीस करत होते. या दरम्यान, पसार झालेला आरोपी मध्यप्रदेशमधील इंदूर येथे येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडून ६० लाख रुपयांच्या तीन मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. (Pune News)
ही महत्त्वपूर्ण कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अरविंद कुमरे, श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, विलास कदम, शेखर शिंदे, सचिन कुटे, सचिन रणदिवे, सुहास निगडे, अविनाश संकपाळ आदींनी केली. (Pune News)
दरम्यान, आरोपी सुफियान चौहानने साथीदारांच्या मदतीने राजस्थानातील पााकिस्तानी सीमेजवळ असलेल्या गावात मोटारींची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चौहानने मुंबईतून देखील अशाच प्रकारे मोटारी चोरल्या होत्या. त्याच्याविरुद्ध मुंबईतही गुन्हे दाखल झाले आहेत.