Pune News : पुणे, ता.११ : वाघोली (ता. हवेली) येथील जी. एच. रायसोनी इंजीनियरिंग आणि मॅनेजमेंट कॉलेजने ३ ते १० ऑक्टोबर दरम्यान मानसिक आरोग्य सप्ताह साजरा केला आहे. यामध्य़े विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली.
४५० विद्यार्थ्यांचा सहभाग
मानसिक आरोग्य सप्ताहच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक कल्याणाची संस्कृती वाढीस लावणे हा उद्देश होता. ३ ते १० ऑक्टोबर दरम्यान कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यात ३ ऑक्टोबरला वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सादरीकरण केले. या खुल्या संवाद स्पर्धेमुळे सकारात्मक विचार विद्यार्थ्यांकडून मांडण्यात आले.
त्यानंतर ४ ऑक्टोबरला, सहयोग आणि वैयक्तिक वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी गट चर्चांसह व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम आयोजित केले. ५ ऑक्टोबरला शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा, पुढील दिवसी नाटक सादरीकरण करण्यात आले. ६ ऑक्टोबरला स्कीट स्पर्धा आणि ५ ऑक्टोबरला कला प्रेमींसाठी “कला अभिव्यक्ती” कार्यक्रम सादर करण्यात आले.
सांघिक भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी आणि विविध अडचणीतून मार्ग काढत समस्या कशा पद्धतीने सोडविता येतील. यासाठी ट्रेजर हंट हा कार्यक्रम ९ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला होता. मानसिक आरोग्याच्या जागरूकतेसाठी महत्त्वाचे योगदान केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. १० ऑक्टोबरला विद्यार्थ्यांच्या सार्वजनिक भाषण कौशल्य सुधारण्याच्या उद्देश्याने कार्यक्रम केले. मानसिक आरोग्याच्या जागरूकतेसाठी आयोजित कार्यक्रमात ४५० विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सहभाग घेतला.
दरम्यान, अतिशय उत्तम अशा नियोजनासाठी जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग आणि मॅनेजमेंटचे कॅम्पस संचालक डॉ. आर. डी. खराडकर यांनी विशेष मार्गदर्शन केले. मनोविज्ञान उपक्रमाच्या मुख्य विद्वेषक सुरभि प्रणव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यासाठी ए.व्ही.पी, डिजिटल सॉल्यूशन्स ग्रुप, डीएम इनोवेशन्स, ए.व्ही.पी, डिजिटल समाधान समूह, डीएम इनोवेशन्स आणि विक्रम मखवाणा, याच्या उपस्थितीत हा सप्ताह पार पडला.