राजेंद्रकुमार शेळके
(Pune News) पिरंगुट, (पुणे) : पिरंगुट येथील विघ्नहर्ता मोबाईल शॉपीचे उद्घाटन श्रीकाली पुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते व आगळ्यावेगळ्या स्वरूपात गोंधळ व शिव तांडव स्तोत्र म्हणून करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर राष्ट्रवादी गटनेते शांताराम इंगवले, मावळचे जनसेवक देवाभाऊ गायकवाड, कट्टर शिवसैनिक आबासाहेब शेळके, सरपंच अक्षय सातपुते भुगाव, सरपंच पौड अजय कडू, माजी सरपंच बाळासाहेब शेडगे, माजी सरपंच सचिन मिरगे, पिरंगुट गावचे सरपंच चांगदेव पवळे मुळशी तालुका पोलीस पाटी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश नारायण पवळे, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष नागेश पवळे, शिवसेना नेत्या स्वाती ढमाले, अमोल शिंदे, महेश राजाराम वाघ, मधुकर दाभाडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
१५० जणांनी केले रक्तदान…!
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान सप्ताह निमित्त आयोजी रक्तदान शिबिदरात सुमारे १५० जणांनी रक्तदान करून सामजिक कार्यात हातभार लावला. यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला एक मोबाईल कव्हर व हेड फोन भेट देण्यात आला .यावेळी साहिल नलावडे व मित्र परिवार यांच्या वतीने या सोहळ्यास सहकार्य केले.
दरम्यान, विनायक देवकर साहेब, चंद्रशेखर हगवणे साहेब, जगदाळे साहेब, इनामदार साहेब अतिशय चांगल्या रित्या शांततेत कार्यक्रम पार पडला विघ्नहर्ता मोबाईल शॉपीचे मालक सागर दादा शिंदे यांच्या हस्ते काली पुत्र कालीचरण महाराजांचा सत्कार करण्यात आला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!