Monday, September 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: ‘महिन्याला 1.5 लाख कमवाल, Life Set होईल’, नोकरीच्या आमिषाने महिलेला पोर्तुगालमध्ये विकलं अन्…

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 10 August 2026, 8:43

पुणे: परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका 28 वर्षीय महिलेला पोर्तुगालमध्ये नेऊन विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरमधील या महिलेने तब्बल महिनाभर छळ सहन केल्यानंतर स्वतःची सुटका करून घेत भारतात परत येत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणामुळे परदेशात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, संबंधित महिला नोकरीच्या शोधात होती. डिसेंबर 2025 मध्ये तिला Instagram वर पुण्यातील विमाननगर भागातील ‘वी मायग्रेट’ या कन्सल्टन्सीची माहिती मिळाली. संपर्क साधल्यानंतर तिला पोर्तुगालमध्ये कॅशिअरची नोकरी देण्याचे सांगण्यात आले. दरमहा सुमारे दीड लाख रुपये पगार आणि दिवसाला 8 तास काम असल्याचे आमिष तिला दाखवण्यात आले.

नोकरी मिळण्याच्या आशेने महिलेने आरोपींना वेगवेगळ्या टप्प्यांत तब्बल 11 लाख रुपये दिले. मात्र, पोर्तुगालमध्ये पोहोचल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. आरोपानुसार, तिला एका बिअर शॉपच्या मालकाकडे सोपवण्यात आले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध काम करण्यासाठी दबाव आणण्यात आला.

महिलेने विरोध केल्यानंतर संबंधित व्यक्तीने तिला भारतातील एजंट्सना पैसे देऊन आणल्याचे सांगितल्याचा दावा तिने तक्रारीत केला आहे. यानंतर तिने पतीशी संपर्क साधून आपली फसवणूक झाल्याची माहिती दिली. पतीच्या सल्ल्यानंतर तिने तेथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला आणि महिनाभराचा त्रास सहन केल्यानंतर भारतात परतली.

 

पुण्यात आल्यानंतर तिने गुन्हे शाखेशी संपर्क साधला. तिच्या तक्रारीवरून पुणे विमानतळ पोलीस ठाण्यात 8 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिभा भाटी, अनिलकुमार, अजहर शेख, वामसी, चैतन्य, हिम्मत सिंग आणि कपिल मिश्रा यांच्यासह इतर आरोपींची नावे तपासात समोर आली आहेत.

परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तरुण-तरुणींची फसवणूक करून मानवी तस्करी करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! “चंद्या खाली ये, आज तुला मारुन टाकतो” म्हणत तरुणावर थेट गावठी पिस्तुलातून गोळीबार

Sunday, 6 September 2026, 23:02

वाघोली–केसनंद वाहतूक कृती समितीची बैठक संपन्न! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विविध उपाययोजनांची मागणी; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sunday, 6 September 2026, 21:57

शिरूरमध्ये मध्यरात्री थरार! गाडीला बस घासल्याचा बनाव करत बसच्या चालक-वाहकाला मारहाण; तिकिटाचे पैसे लुटले, चावी हिसकावत दगडफेक करत लुटारू पसार

Sunday, 6 September 2026, 21:07

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पा-सलून सेंटरवर कारवाई न करण्यासाठी ८० हजारांची लाच घेणारा हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Sunday, 6 September 2026, 20:37

आयोगातील असो किंवा बाहेरचा, कुणाचीही कसलीही खैर नाही! परीक्षा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका

Sunday, 6 September 2026, 19:58

‘आई, तू तुझी काळजी घे’ आईला शेवटचं बोलली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; पतीची ‘ती’ एक मागणी अन् संसार उध्वस्त…

Sunday, 6 September 2026, 19:15
Next Post

‘रतन टाटा सांगतायत म्हणजे खरं असेल!’ पुण्यातील महिलेने विश्वास ठेवला अन् काही तासांत 4 लाख 9 हजारांचा चुना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp