पुणे, ता. 16 : दारुड्या पतीच्याच मित्राने अंधाराचा (Pune Crime) फायदा घेऊन विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना आंबेगाव तालुक्यातील एका गावात रविवारी (ता.11) रात्री साडेबारा (Manchar News) वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात एकाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

राजू गावडे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 21 वर्षीय विवाहितेने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. पिडीता यांचे पती व राजू गावडे या दोघांनाही दारू पिण्याचे व्यसन आहे. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपीने पिडीता यांच्या पतीला घरी सोडवले. त्यानंतर निघून गेला होता.
रविवारी (ता.11) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास राजू गावडे याने घराच्या दरवाजाला लावलेली लाकड़ी काठी हात घालून काढली. आणि घरात प्रवेश केल्यानंतर लाईटचा बल्ब गेल्यामुळे सर्वत्र अंधार झाला. अंधाराचा फायदा घेत आरोपीने पिडीत विवाहीतेशी शाररीक संबंध प्रस्तापित केले. त्यानंतर महिलेला हा आपला पती नसून दूसरा कोणीतरी इसम आहे असा संशय आला. त्यानंतर पिडीतेने मोठमोठयाने आरडा ओरडा केला तेव्हा आरोपीने तेथून धूम ठोकली.
दरम्यान, लाईटच्या प्रकाशात पिडीतेच्या नातेवाईकांना पळून जाणारा व्यक्ती हा राजू गावडे असल्याचे दिसून आले. याप्रकरणी पिडीतेने मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी राजू गावडे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 64 (1), 332 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







