Pune Crime: पुणे: पुण्यातील (Pune) आळंदी येते एका किरकोळ वादातून चार मित्राचे अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आले. या प्रकरणी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी पाच जणांना अटक करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. या घटनेचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट 3 कडून करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन जण आणि दोन अल्पवयीन मिळून अशा एकूण पाच आरोपींनी पीडितांना मारहाण केली. मारहाण करत चारही मित्रांना वाहनातून बाहेर काढले, त्यांच्याकडून पैसे आणि मोबाईल घेतले आणि दोघांचे अपहरण करून त्यांना जंगल परिसरात सोडून दिले.
पोलिसांनी सुबोध मल्हारी कांबळे (20, भोसरी), ओंकार संजय कांबळे (18, दिघी), सूरज महादेव शिंदे (19, भोसरी) आणि दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. पीडित सुदर्शन महादेव आडे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यासह मित्र विकास अर्जुन सोनकांबळे आणि संतोष भाऊसाहेब हंबर्डे यांच्यावर देखील हल्ला करून त्यांचे अपहरण करण्यात आले.
“पीडित आणि त्याचा मित्र त्यांच्या कारमध्ये असताना आरोपी टेम्पो घेऊन जात होते. दरम्यान, त्यांच्या कारला धडक लागली होती. त्यांनी दोघांना थांबवले आणि सुरुवातीला मार्ग विचारण्याचा बहाणा केला. त्यानंतर नुकसानभरपाईच्या नावाखाली पैसे मागण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपींनी चौघांनाही मारहाण केली आणि दोन मित्रांना टेम्पोमध्ये बसवून चाकणकडे निघाले.
ही घटना रविवारी पहाटे घडली असून त्याच दिवशी प्रकरणाची नोंद घेण्यात आली. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.







