मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनात निरोगी राहण्यासाठी आहारात जवसचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. जवसमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. जवस हे आपल्या शरीरासाठी अनेक महत्त्वाचे पोषक घटक पुरवते. जवसमध्ये ‘एएलए’ (ALA) नावाचा घटक असतो, जो शाकाहारी लोकांसाठी ओमेगा-3 चा उत्तम स्रोत आहे. तसेच यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. जवस हे इतर पदार्थांच्या तुलनेत 75 ते 800 पट अधिक लिग्नॅन्स पुरवते. हे प्रभावी अँटीऑक्सिडंट्स आहेत. तसेच, व्हिटॅमिन बी6, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे घटकही यात असतात.

जवस खाण्याचे प्रमुख आरोग्य फायदे
- जवसामध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड रक्तातील खराब कोलेस्टेरॉल कमी करतात. यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
- तंतुमय घटक असल्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनक्रिया चांगली राहते. मात्र, जवस खाताना पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
- जवसातील लिग्नॅन्स हे अँटीऑक्सिडंट्सप्रमाणे कार्य करतात आणि विशेषतः स्तन कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोग यांसारख्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
- जवसातील ओमेगा-3 आणि व्हिटॅमिन ई मुळे त्वचा तजेलदार राहते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळून केस गळती कमी होते.
कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण देणारे लिग्नॅन्स जवसामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने, दैनंदिन आहारात जवसचा समावेश करणे हा एक आरोग्यदायी पर्याय ठरतो. म्हणूनच, आपल्या एकूण आरोग्यासाठी जवसाचे सेवन करणे अनिवार्य आहे.







