युनूस तांबोळी
शिरुर : मीना सिंचन शाखा टाकळी हाजी येथे आयटीसी मिशन सुनहरा कल व अफार्म संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी वापर संस्था सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. मिना शाखा कालवा अध्यक्ष प्रकाश वायसे, मिना शाखा कालव्याचे राज्य समन्वयक तुषार जगताप, श्रीकृष्ण पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण झिंजाड, प्रकाश वायसे सदस्य घोड व कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समिती अध्यक्ष मीना शाखा कालवा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
अमितकुमार मेहत्रे यांनी आयटीसी व अफार्म या संस्था शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने मार्गदर्शनपर काम करतात, याची विस्तृत माहिती देतानाच पाणी वापर संस्था व त्यांची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. सुभाष अण्णा झिंजाड यांनी पाणी वापर संस्था सक्षम होण्यासाठी आवश्यक त्या बाबी पाणी वापर संस्थांनी पूर्ण करणे किती गरजेचे आहे आणि त्या बाबी कोणत्या याचे सविस्तर विवेचन मांडले.
तुषार जगताप यांनी मार्गदर्शन करताना मीना शाखा कालवा हा वाघाडसारखा प्रकल्प होऊ शकतो, त्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींवर मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणात प्रकाश वायसे यांनी २०१९ पूर्वीचा मीना शाखा कालवा व २०१९ नंतर होत असलेला बदल व भविष्यात मीना शाखा कालव्यावरील सर्व पाणी वापर संस्थांच्या सहकार्याने मीना शाखा कालवा हा आदर्श कालवा करण्यासाठी कटिबद्ध राहील, असे आश्वासन दिले.
यावेळी सखाराम खामकर, विक्रम पवार, अनिकेत भाकरे तसेच टाकळी हाजी शाखा अतंर्गत सर्व कर्मचारी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी व सभासद शेतकरी उपस्थित होते.