राहुलकुमार अवचट
यवत : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बारामती तालुका अध्यक्षपदी प्रकाश काळखैरे यांची आणि दौंड तालुका सरचिटणीसपदी यवत येथील पुनम जाधव यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अजय पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख अनिल ताडगे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय पासलकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष तुषार (गणेश) शेळके, पुणे शहर सरचिटणीस मयूर गुजर, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक रेखा कोंडे व उज्वला ताडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य प्रकाश काळखैरे मित्र परिवार व सहकाऱ्यांनी केले होते. या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे जिल्हा उपाध्यक्ष तुषार शेळके व सामजिक कार्यकर्ते सतिश ताडगे यांनी केले.