लोणी काळभोर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्य जनतेसाठी जलजीवन योजना ,शेतकऱ्यांसाठी पीकविमा, सन्मान योजना देऊन वीजबिल माफी केली आहे. सरकारने महिलांसाठी अर्ध्या दराने बस प्रवास व मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून बहिणींना पैसे दिले आहेत. त्याचबरोबर मोफत रेशन धान्य व तीन गॅस मोफत दिले आहेत. महायुती सरकारने राज्यात अनेक कामे करून विकासकामांची गंगा वाहिली आहे. त्यामुळे शिरूर हवेली विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके विजयी भव होणारच. असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पिडीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी केले आहे.
शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी हवेलीत प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. ज्ञानेश्वर कटके यांचे कुंजीरवाडी (ता. हवेली) चौकात फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील हनुमान मंदिराजवळ एक छोटेखानी सभा झाली. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन प्रदीप कंद यांनी केले आहे.
यावेळी बोलताना प्रदीप कंद म्हणाले की, शिरूर हवेली तालुक्यातून तुम्हा दोघांपैकी एक उभा राहा. अशी जनता वारंवार सांगत होती. त्यातच पक्षाचे आदेश आल्याने निवडणुकीतून माघार घेतली आहे. आणि संयम आणि समजूतदारपणे मोठ्या भावाची भूमिका बजावून माऊलींना पाठींबा दिला आहे. तुम्ही विकासकामांची चिंता करायची सोडून द्या. याची सर्व जबाबदारी आमच्या सगळ्यांची आहे. तुम्ही फक्त सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ज्ञानेश्वर कटके याच्या समोरील घड्याळ्याचे बटन खटाखट दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा. असे आवाहन प्रदीप कंद यांनी यावेळी केली आहे.
त्यांची खोटे बोला अन रेटून बोला भूमिका : ज्ञानेश्वर कटके
यावेळी बोलताना ज्ञानेश्वर कटके म्हणाले की, शिरूर व हवेली तालुक्यात 2009 सालापासून शेतकरी, नोकरदार, कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक समस्या आहे. तर पुणे सोलापूर व पुणे नगर रस्त्याच्या समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र नागरिकांच्या या समस्यांकडे विद्यमान आमदाराने दुर्लक्ष केले आहे. त्यांनी फक्त खोटे बोला अन रेटून बोला अशी भूमिका मांडली आहे. महायुती सरकारकडून आम्ही अनेक विकासकामे आणली आहेत. मात्र या महाशयांनी अधिकाऱ्यांना फोन करायचा. या कामांची माहिती घ्यायची आणि आम्ही कामे आणले म्हणून कार्यसम्राट आमदार म्हणून पोस्ट टाकायच्या. अशी त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याची कामे केली आहेत.
घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे. २२ हजाराहून अधिक सभासद व कामगार रस्त्यावर आले आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा व आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. समाज आपल्याला निवडून देत असतो. त्यामुळे आपण समाजहिताचे काम केले पाहिजे. तुम्ही कुणाच्या परडीत एक रुपया टाकता तरी कधी आणि आमच्या उज्जैन देवदर्शन घडवून आणल्याबद्दलच्या बाता मारता. उज्जैन तर झाकी होती अयोध्या और काशी अभी तो बाकी है!
View this post on Instagram
दरम्यान, ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे. भरपूर लोकांचे खाल्ले आहे. कारखान्याची ५ एक जागा स्वताच्या नावावर करून घेतली आहे. स्वत: आमदार, बायकोला सभापती पद, मुलगा चेअरमन अशी त्यांची निष्टा आहे. सबका साथ सबका विकास नाही! माझा विकास, माझ्या कुटुंबाचा विकास? अशी त्यांची ध्येयधोरणे आहेत. आपल्या सर्वांच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून ही एक महत्वाची निवडणूक आहे. जनता ही जागृत असून स्वाभिमानीसुद्धा आहे. त्यामुळे मतदार राजा यंदा परिवर्तन करून नक्कीच क्रांती घडवील. माझा विजयी नक्की झालेला असेल तसेच ज्याची त्याला योग्य जागा दाखवेल. असे यावेळी बोलताना ज्ञानेश्वर कटके म्हणाले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा पुनम चौधरी, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप वाल्हेकर, कुंजीरवाडीचे सरपंच हरेश गोठे, माजी सरपंच सचिन तुपे, पेठचे माजी सरपंच सुरज चौधरी, कोलवडीचे सरपंच विनय गायकवाड, नवनाथ काकडे, अलंकार कांचन, पै. आबा काळे, विपुल शितोळे, गणेश सातव, गणेश शेलार, संग्राम कोतवाल, चारोशीला कांचन, सिद्धांत तुपे, पोलीस पाटील मिलिंद कुंजीर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.