बापू मुळीक
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एस टी महामंडळ आहे. एसटी महामंडळाकडे कमी प्रमाणामध्ये एसटी बस उपलब्ध असल्यामुळे पुरंदर तालुक्यातील नागरिकांना व शाळेतील मुला मुलींना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. सासवड हे तालुक्याचे गाव असल्यामुळे पुरंदर तालुक्यातून अनेक वाडी वस्ती ग्रामीण भागातून शाळेतील मुल-मुली शिक्षणासाठी सासवड या ठिकाणी तालुक्याचे गाव असल्याने शिकण्यासाठी येत असतात. परंतु एसटी महामंडळाकडे असलेल्याबसची संख्या कमी असल्याने तासनतास नागरिकांना एसटीची वाट पाहावी लागत आहे.
काल वीर सासवड रोडवर एका मागे एक तीन एसटी बस बंद पडल्याने मुला मुलींना शाळेमध्ये जाता आलं नाही. याची एसटी महामंडळ जबाबदारी घेणार का व शैक्षणिक नुकसान भरपाई देणार का? असा प्रश्नच नागरिक विचारात आहेत. पांगारे घाटामध्ये एसटी बस बंद पडल्याने मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एसटी बस कमी प्रमाणात असल्यामुळे अनेक ठिकाणी एसटी बस बंद पडलेल्या पाहावयास मिळत आहे.
एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे नवीन बसची मागणी करावी. अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. नवीन एसटी बस मिळाल्यानंतर नागरिकांचे हाल होणार नाहीत. मुला मुलींची शैक्षणिक नुकसान होणार नाही. लवकरात लवकर नवीन गाड्या मिळाल्या नाही तर पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्याकडून आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे. राज्य सरकार व एसटी महामंडळ काय भूमिका घेत हे पाहावं लागणार आहे.