Sunday, August 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धनश्री लॉजवर पुन्हा पोलिसांचा छापा! देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; लॉज चालक जेरबंद, सात महिलांची सुटका

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 30 July 2026, 18:56

दौंड, ता. ३० : पुणे-सोलापूर महामार्गावरील वाखारी (ता. दौंड) येथील धनश्री लॉजवर यवत पोलिसांनी पुन्हा एकदा नुधावरी (ता.२९) मध्यरात्री धडक कारवाई करत कथित देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत लॉज चालकाला अटक करण्यात आली असून विविध राज्यांतील सात महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनयकुमार रविंद्र हेगडे (वय ४०, मूळ रा. उडपी, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार महेंद्र संभाजी चांदणे यांनी सरकारच्या वतीने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सलग दुसऱ्यांदा झालेल्या या धडक कारवाईमुळे पुणे-सोलापूर महामार्गालगत सुरू असलेल्या कथित अनैतिक व्यवसायांवर मोठा आघात झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाखारी (ता. दौंड) गावच्या हद्दीतील धनश्री लॉजमध्ये महिलांकडून देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार परि. पोलीस उपअधीक्षक भूषण माने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला.

बनावट ग्राहकाने लॉजमध्ये जाऊन महिलेची मागणी करत एक हजार रुपये दिल्यानंतर पूर्वनियोजित इशारा दिला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ लॉजवर धाड टाकून संपूर्ण परिसर ताब्यात घेतला. या छाप्यात विनयकुमार हेगडे हा लॉज चालक महिलांकडून अनैतिक देहव्यापार करून घेत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. चौकशीत एका ग्राहकाकडून एक हजार रुपये घेऊन त्यापैकी पाचशे रुपये महिलेला आणि उर्वरित पाचशे रुपये स्वतः ठेवत असल्याची माहिती आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

या कारवाईदरम्यान विविध राज्यांतील सात महिलांची सुटका करण्यात आली. तसेच बनावट ग्राहकाकडून देण्यात आलेली एक हजार रुपयांची रक्कम आणि कंडोम पाकिटे असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी आरोपी विनयकुमार रविंद्र हेगडे याच्याविरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गाढवे करत आहेत.

दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कारवाई

विशेष म्हणजे, १८ मे रोजीही यवत पोलिसांनी याच धनश्री लॉजवर छापा टाकून १० पीडित महिलांची सुटका केली होती. त्या कारवाईत प्रदीप बाबू पुजारी (मूळ रा. उडपी, कर्नाटक) आणि शहबाज सिराज सय्यद (रा. वरवंड, ता. दौंड) यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा त्याच लॉजवर देहव्यापार सुरू असल्याचे समोर आल्याने पोलिसांच्या कारवाईनंतरही हा अवैध व्यवसाय पुन्हा कसा सुरू झाला, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड पोलिसांत मोठे फेरबदल! तब्बल १२ नवीन पोलिस निरीक्षकांची आयुक्तालयात एन्ट्री; दोघांची बदली

Sunday, 9 August 2026, 20:34

बायकोला सोडून दुसरीच्याच प्रेमात पडला! तिच्यावर पैसा उधळला अन् सत्य समोर येताच अधिकाऱ्यासोबत घडलं भयंकर…

Sunday, 9 August 2026, 19:45

‘माझा सोन्याचा झुमका का चोरला?’ महिलेचा तरुणावर आरोप; पैसे उकळून धमकी देत मानसिक छळ अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 9 August 2026, 18:56

महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्थेला मोठा धक्का! 526 अनधिकृत शाळा बिनधास्त सुरू; RTIमधून धक्कादायक खुलासा

Sunday, 9 August 2026, 18:48

अमानुष कृत्याने पुणे पुन्हा सुन्न! खराडी परिसरात नदीपात्रात आढळला नवजात मुलीचा मृतदेह

Sunday, 9 August 2026, 17:55

कोरेगाव मूळ येथील नामांकित नर्सरी व्यावसायिक नितीन शितोळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन..

Sunday, 9 August 2026, 17:50
Next Post

'तुझे माझ्या बायकोसोबत.." संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् त्यानं मित्रालाच संपवलं! पोलीस तपास आणि हत्येचं सत्य कसं आलं समोर?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.