Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चाकण-हिंजवडीच्या विकासाचा मेगाप्लॅन जाहीर! मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तब्बल १,८२६ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 29 September 2026, 12:29

पुणे : चाकण आणि हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी तसेच नागरी सुविधांच्या प्रश्नांवर राज्य सरकारने मोठा आराखडा तयार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत चाकणमधील पायाभूत सुविधांसाठी १ हजार ४०० कोटी रुपयांच्या आराखड्याला, तर हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ४२६ कोटी रुपयांच्या आराखड्याला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. डिसेंबरपासून कामांना सुरुवात करण्याचे नियोजन असून, पुढील पावसाळ्यापूर्वी चाकणमधील वाहतूक आणि पाणी निचऱ्याच्या समस्येत सुधारणा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

चाकणमधील विकासकामांसाठी एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि इतर संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चाकण औद्योगिक परिसरात पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या मोठी आहे. परिसरातील सुमारे ७८ किलोमीटरच्या नैसर्गिक नाल्यांवर अतिक्रमणे झाल्याने पाण्याचा प्रवाह अडत असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. त्यामुळे उद्योगांमध्ये पाणी शिरणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि कामकाजावर परिणाम होण्याच्या घटना घडतात.

नैसर्गिक नाले मोकळे करणे, रस्त्यांच्या कडेला पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी गटारे उभारणे, कल्व्हर्ट आणि पुलांची क्षमता वाढवणे यावर भर दिला जाणार आहे. नाल्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची ७० ते ८० टक्के कार्यवाही पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. जून २०२७ पर्यंत नाले मोकळे करून निचरा व्यवस्था पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय सुमारे ३८ किलोमीटर लांबीची रस्त्यालगतची पावसाळी गटार व्यवस्था उभारली जाणार आहे.

चाकणमधील ४९८ किलोमीटरच्या रस्ते जाळ्याचा अभ्यास करून पहिल्या टप्प्यात सुमारे ७५ किलोमीटर रस्त्यांची सुधारणा केली जाणार आहे. या रस्त्यांवर पादचारी मार्ग, सुरक्षित रस्ता ओलांडण्याची व्यवस्था आणि आवश्यक वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे ५०० अतिरिक्त बसची आवश्यकता असून, सहा महत्त्वाच्या चौकांची पुनर्रचना करण्याचेही नियोजन आहे. तसेच एआय आधारित सिग्नल, कॅमेरे, रडार, वाहन क्रमांक ओळख प्रणाली आणि कमांड सेंटर उभारले जाणार आहे.

 

चाकणमध्ये मोठ्या वाहनांसाठी पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजना २०२७ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन असून, १०० एमव्हीए क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे काम डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी केंद्रीकृत प्रक्रिया केंद्र उभारण्याची तयारीही सुरू आहे.

दरम्यान, हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ४२६ कोटी रुपयांचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. हिंजवडीतील वीजपुरवठ्याच्या समस्या सोडवण्यासाठी सहा एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चाकण, तळेगाव आणि हिंजवडीतील वाहतूक व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा उभारण्याचे नियोजन असून, वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून वाहतुकीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. चाकण परिसरासाठी १ ऑक्टोबरपासून महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० जवान उपलब्ध करून देण्याचेही नियोजन आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात थरार! ‘तू त्यांच्या गँगशी मैत्री का केली?’ म्हणत भररस्त्यात तरुणाला अडवलं; पिस्तूल रोखत बांबूने मारहाण, परिसरात दहशत…

Wednesday, 30 September 2026, 14:27

फॉर्म 6 मधून SIRचा वादग्रस्त भाग हटवला! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; नव्या मतदारांना मोठा दिलासा

Wednesday, 30 September 2026, 14:11

दुष्काळग्रस्त 265 तालुक्यांतील इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये – राज्य मंडळाच्या सूचना

Wednesday, 30 September 2026, 14:01

सचिन वाझे प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; जामिनावर सुनावणी नाकारली, NIAला धक्का

Wednesday, 30 September 2026, 13:28

शिरूरच्या पीडीसीसी जागेसाठी राजकीय रणधुमाळी! अशोक पवारांसमोर जासूद की गायकवाड? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत उमेदवारीसाठी रस्सीखेच

Wednesday, 30 September 2026, 13:04

हवेलीतील PDCCच्या लढतीत रंगणार तिरंगी सामना? प्रकाश मस्के, विकास दांगट की दिलीप काळभोर; उत्सुकता वाढली

Wednesday, 30 September 2026, 12:49
Next Post

WhatsApp मध्ये मोठा बदल होणार! Android युजर्सना दिसणार iPhone सारखा नवा लूक; पाहा काय बदलतंय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp