Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तुझे माझ्या बायकोसोबत..” संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् त्यानं मित्रालाच संपवलं! पोलीस तपास आणि हत्येचं सत्य कसं आलं समोर?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 30 July 2026, 19:25

पुणे: पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात झुडपात पोत्यात भरलेला तरुणाचा मृतदेह आढळल्याच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला. शिक्रापूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) संयुक्त तपासातून हा खून असल्याचे स्पष्ट झाले असून, या प्रकरणी एका दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.

24 ते 26 जुलैदरम्यान करंजेनगर परिसरातील मोकळ्या मैदानात झुडपात पोत्यात भरलेला मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांसमोर सर्वात मोठे आव्हान मृताची ओळख पटवण्याचे होते. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी पुरावे गोळा केले. त्याचबरोबर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आणि गुप्त बातमीदारांचे जाळेही सक्रिय करण्यात आले. या तपासातून मृत तरुणाची ओळख गौरव उर्फ अक्षय अशोक वायकर (वय 24, मूळ रा. थेऊर) अशी पटली.

तपासाचा वेग वाढवत पोलिसांनी गौरवच्या हालचालींची माहिती घेतली असता तो करंजेनगर येथे मुकेश विठ्ठल सोनवणे आणि त्याची पत्नी जान्हवी पाटोळे यांच्यासोबत राहत असल्याचे समोर आले. चौकशीदरम्यान गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली.

 

चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अनैतिक संबंधाच्या संशयातून मुकेश सोनवणे याने गौरवचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पत्नी जान्हवी हिने मृतदेह पोत्यात भरून निर्जन झुडपात टाकण्यासाठी मदत केल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

मृत तरुणाची आई कांचन अशोक वायकर यांच्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, हत्येमागील नेमके कारण, घटनाक्रम आणि इतर पुरावे तपासून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दौंडमध्ये उद्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’; अजित पवार जयंती आणि मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष आयोजन

Thursday, 30 July 2026, 20:04

सोरतापवाडीत 30 लाखांच्या हायवा ट्रकसह चोरीची वाळू जप्त; ट्रक चालकाला अटक तर ट्रक मालक लोणी काळभोरचा, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Thursday, 30 July 2026, 19:59

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात रंगणार साहित्यसम्राट डॉ. अण्णा भाऊ साठे यांचा १०६ वा जयंती महोत्सव

Thursday, 30 July 2026, 19:55

CJP आंदोलन प्रकरणात मोठा ट्विस्ट! आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत दिल्ली पोलिसांची स्पष्ट भूमिका, म्हणाले….

Thursday, 30 July 2026, 19:29

‘तुझे माझ्या बायकोसोबत..” संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् त्यानं मित्रालाच संपवलं! पोलीस तपास आणि हत्येचं सत्य कसं आलं समोर?

Thursday, 30 July 2026, 19:25

धनश्री लॉजवर पुन्हा पोलिसांचा छापा! देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; लॉज चालक जेरबंद, सात महिलांची सुटका

Thursday, 30 July 2026, 18:56
Next Post

CJP आंदोलन प्रकरणात मोठा ट्विस्ट! आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत दिल्ली पोलिसांची स्पष्ट भूमिका, म्हणाले....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.