बापू मुळीक
पुरंदर : पुरंदर तालुक्यातील सासवड या शहरांमध्ये गणेशोत्सव व विसर्जन मिरवणूक शांततेत व आनंददायी व्हावी, यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सासवड पोलीस प्रशासनातर्फे सासवड शहरात सशस्त्र पथसंंचलन करण्यात आले. नेताजी चौक, चांदनी चौक, श्रीनाथ चौक, कन्हैया चौक, अमर चौकातून पोलिसांचे पथसंचालन करण्यात आले. यावेळी वाघ डोंगर या ठिकाणच्या पेशवे मैदानावर दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे, अर्चना पाटील, श्रीराम पालवे, चोरगे ए एस, यासह सासवड जेजुरी व राजगड पोलीस ठाण्याचे अधिकारी, पोलीस सहाय्यक, फौजदार ,पोलीस, हवालदार, होमगार्ड असे एकूण 55 हून अधिक कर्मचारी या रंगीत तालमीत सहभागी झाले होते. अशी माहिती सासवड पोलीस स्टेशन येथून मिळाली.