Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पेन्शनधारकांनो सावधान! लाईफ सर्टिफिकेट अपडेटच्या नावाखाली हडपसर येथील 70 वर्षीय ज्येष्ठाला घातला 3.83 लाखांचा गंडा

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 21 November 2026, 10:40

हडपसर, ता. 21 : पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून सायबर चोरट्यांनी ऑनलाइन फसवणुकीचा नवा डाव टाकला आहे. लाईफ सर्टिफिकेट अपडेट करण्याच्या बहाण्याने सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा अधिकारी असल्याचे भासवून एका भामट्याने 70 वर्षीय निवृत्त बँक अधिकाऱ्याला तब्बल 3 लाख 83 हजार 500 रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. व्हॉट्सॲपवर पाठविलेल्या लिंकवर वैयक्तिक माहिती भरताच त्यांच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर वळविण्यात आली. या प्रकरणी हडपसर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अनूप मुलचंद भटनागर (वय 70 , रा. अँड्रिनो टॉवर्स, अमनोरा पार्क टाउन, हडपसर) असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. भटनागर हे बँक ऑफ इंडियाचे नव्हे, तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी असून, त्यांचे खराडी शाखेत पेन्शन खाते आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून भटनागर यांना 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी फोन आला. संबंधित व्यक्तीने आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मुख्य कार्यालयातून बोलत असून, आपले नाव रवीकुमार असल्याचे सांगितले. यंदाचे लाईफ सर्टिफिकेट अद्याप अपडेट झाले नसल्याने ते अपडेट करण्यासाठी मदत करणार असल्याचे त्याने भटनागर यांना सांगितले. त्यानंतर पेन्शन कार्ड क्रमांक, पीएफ क्रमांक आदी वैयक्तिक माहिती विचारून घेतली.

भटनागर यांनी यंदा आजारपणामुळे लाईफ सर्टिफिकेट सादर केले नसल्याने संबंधित व्यक्तीवर विश्वास ठेवला. त्यानंतर भामट्याने त्यांच्या व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगितले. तसेच नाव, पेन्शन कार्ड क्रमांक, पीएफ क्रमांक आणि आधार क्रमांक भरल्यास अवघ्या दोन तासांत पेन्शन खाते सक्रिय होईल आणि लाईफ सर्टिफिकेट अपडेट होईल, असे आमिष दाखवले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून भटनागर यांनी लिंक उघडून मागितलेली माहिती भरली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मोबाईल तपासला असता, त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढल्याचे संदेश दिसून आले. बँकेत जाऊन चौकशी केली असता, 6 नोव्हेंबर रोजी दोन व्यवहारांद्वारे अनुक्रमे 2 लाख रुपये आणि 1 लाख 83 हजार 500 रुपये, अशी एकूण 3 लाख 83 हजार 500 रुपयांची रक्कम परस्पर वळविण्यात आल्याचे समोर आले. आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ७ नोव्हेंबर रोजी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

या प्रकरणी अनोळखी मोबाईलधारक, संबंधित बँक खात्यांचे धारक आणि फसवणुकीची रक्कम वळविण्यात आलेल्या खात्यांच्या वापरकर्त्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे करीत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनो, सावधान! बँकेचे अधिकारी असल्याचे सांगून फोन करणाऱ्या अनोळखी व्यक्तींना आधार क्रमांक, पेन्शनची माहिती, ओटीपी किंवा बँकविषयक गोपनीय माहिती देऊ नका. व्हॉट्सॲपवर आलेल्या अनोळखी लिंक उघडून वैयक्तिक माहिती भरू नका. कोणतीही शंका असल्यास थेट संबंधित बँकेच्या अधिकृत शाखेशी संपर्क साधा.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भाजपच्या महापौरांनी उचललं टोकाचं पाऊल? विष प्राशन केल्याचा आमदारांचा मोठा खुलासा,नेमकं घडलं काय?

Sunday, 22 November 2026, 15:21

विहिरीत पडलेल्या दुर्मिळ ‘जवाडी मांजरा’ला जीवदान; वनविभाग आणि सर्पमित्रांची यशस्वी रेस्क्यू मोहीम!

Sunday, 22 November 2026, 14:59

सोनं खरेदीची सुवर्णसंधी!आठवडाभरात तब्बल 10% घसरण; ग्राहकांची चांदी, आणखी स्वस्त होणार सोनं?

Sunday, 22 November 2026, 14:49

अन् बॉयफ्रेंडनं प्रेयसीचं घर पेटवलं! ब्रेकअप केल्यानं डोकं सटकलं अन् आई-वडील घरात असतांनाच घराला आग लावत…

Sunday, 22 November 2026, 14:38

बारामतीत माजी सैनिकासोबत घडलं भयंकर! दागिन्यांच्या दुकानातून बाहेर पडताच दोघांनी गाठलं; पोलीस असल्याचं सांगत झडती घेतली अन्…

Sunday, 22 November 2026, 14:36

पुणेकरांनो सावधान! पुणे-नगर रस्त्यावर मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; भररस्त्यात अडवून मारहाण अन् लुटमारीचे प्रकार…

Sunday, 22 November 2026, 14:26
Next Post

पुण्यातील बेकायदेशीर करिअर अकॅडमींवर कारवाई करा; शौर्य करिअर अकॅडमीतील हाणामारीच्या घटनेनंतर क्रांती शेतकरी संघ आक्रमक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp