पुणे : लग्नाचा हंगाम सुरू असताना सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. गेल्या 7 दिवसांत सोन्याच्या दरात चांगलीच घट झाली आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव सुमारे 9.5 टक्क्यांनी कोसळले असून, ते 14 महिन्यांतील सर्वात खालच्या पातळीवर आले आहेत. आठवड्याभरात सोन्याचा भाव 12540 रुपयांनी कमी झाल्यामुळे, आता सोन्याचे दर आणखी खाली येतील का, अशी चर्चा ग्राहकांमध्ये सुरू आहे.

वेगवेगळ्या शहरांतील आजचे दर (प्रति 10 ग्रॅम)
22 नोव्हेंबर 2026 च्या ताज्या आकडेवारीनुसार, विविध शहरांतील सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत:

शहर 24 कॅरेट दर (रुपये) 22 कॅरेट दर (रुपये)
मुंबई 1,25,080 1,14,650
पुणे 1,25,080 1,14,650
दिल्ली 1,25,230 1,14,800
चेन्नई 1,25,080 1,14,650
सोन्याचे भाव का घसरले?
महागाईचा दबाव आणि फेडचा पवित्रा: अमेरिकेतील महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी व्याजदर अधिक काळ चढेच राहिले तर सोन्याच्या किमतींवर दबाव येतो. शिवाय, अमेरिकन मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह डिसेंबरमध्ये व्याजदर वाढवेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार सोन्याऐवजी इतर गुंतवणुकीचे पर्याय निवडत आहेत.
डॉलरची वाढती ताकद: अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने इतर देशांतील खरेदीदारांसाठी सोने महाग पडत आहे, ज्यामुळे सोन्याची मागणी कमी झाली आहे.
महागाईची अनिश्चितता: अमेरिकेतील महागाईबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने सोन्यात पैसे गुंतवण्यावर परिणाम झाला आहे.
शेअर बाजारातील तोटा: AI क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत घट झाल्याने, शेअर बाजारातील नुकसान भरून काढण्यासाठी काही गुंतवणूकदारांनी सोने विक्रीस काढले. त्यामुळे दरात आणखी घसरण झाली.





