Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील बेकायदेशीर करिअर अकॅडमींवर कारवाई करा; शौर्य करिअर अकॅडमीतील हाणामारीच्या घटनेनंतर क्रांती शेतकरी संघ आक्रमक

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 21 November 2026, 11:29

हडपसर, ता. 21 : हडपसरमधील गोंधळेनगर येथील शौर्य करिअर अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खासगी करिअर अकादमींमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अकादमीमध्ये आपल्या मुलावर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप पालकांनी केला होता. तसेच, या घटनेची चौकशी करण्यासाठी अकादमीमध्ये गेलेल्या पालकांना संचालक हरीदास भिसे यांनी दमदाटी करून दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला होता. या घटनेची दखल घेत क्रांती शेतकरी संघाने आता पुणे शहरातील अनधिकृत पोलिस भरती, एमपीएससी आणि यूपीएससी करिअर अकादमींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

क्रांती शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी यासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, आयकर विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. शहरातील सर्व खासगी करिअर अकादमींची संयुक्त पथकामार्फत तपासणी करावी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अकादमी सील कराव्यात आणि संबंधित संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पोलिस भरती तसेच एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षांच्या तयारीसाठी ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी पुण्यात येतात. मोठ्या अपेक्षेने विद्यार्थी या अकादमींमध्ये प्रवेश घेतात. मात्र, काही अकादमींकडून आवश्यक कायदेशीर परवानग्या न घेता शैक्षणिक व्यवसाय सुरू असल्याचा आरोप तुपे यांनी केला आहे. विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जात असताना त्यांना सुरक्षित सुविधा, पारदर्शक आर्थिक व्यवहार आणि आवश्यक सोयी उपलब्ध करून दिल्या जातात का, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

अकादमींची व्यवसाय नोंदणी, शॉप अ‍ॅक्ट परवाना, जागेचा व्यावसायिक वापर, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, इमारतीची बांधकाम परवानगी, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार आवश्यक नोंदणी अशा सर्व बाबींची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिस भरतीच्या सरावासाठी वापरण्यात येणाऱ्या मैदानांची परवानगी, निवासी अकादमींमधील वसतिगृह व मेसचे परवाने तसेच अन्नाच्या गुणवत्तेचीही तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, अकादमींचे शुल्क व्यवहार, जीएसटी नोंदणी, आर्थिक लेखापरीक्षण आणि विद्यार्थ्यांना शुल्काच्या पावत्या दिल्या जातात का, याची चौकशी करावी. विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक किंवा करचुकवेगिरी झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि बेहिशोबी मालमत्तेची आयकर विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणीही तुपे यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू करा!
अनेक विद्यार्थी अकादमी चालकांच्या दबावामुळे किंवा भविष्यातील शैक्षणिक नुकसानाच्या भीतीने तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा पोलिस आयुक्तालयात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू करावा. विद्यार्थ्यांच्या तक्रारींची गोपनीयता राखून त्यावर तातडीने कार्यवाही करावी. पुणे शहरातील सर्व करिअर अकादमींचे विशेष तपासणी अभियान राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अमोल तुपे यांनी केली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यातील बेकायदेशीर करिअर अकॅडमींवर कारवाई करा; शौर्य करिअर अकॅडमीतील हाणामारीच्या घटनेनंतर क्रांती शेतकरी संघ आक्रमक

Saturday, 21 November 2026, 11:29

पेन्शनधारकांनो सावधान! लाईफ सर्टिफिकेट अपडेटच्या नावाखाली हडपसर येथील 70 वर्षीय ज्येष्ठाला घातला 3.83 लाखांचा गंडा

Saturday, 21 November 2026, 10:40

सिंहगड संस्थेतील कथित गैरव्यवहाराचे धागेदोरे सरकारी यंत्रणेपर्यंत? मुंबई हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश

Saturday, 21 November 2026, 10:31

सलमान खानने मागितली श्रद्धा कपूरची जाहीर माफी! 4 डिसेंबरला ‘मातृभूमी’ आणि ‘ईठा’ची टक्कर; प्रदर्शनाच्या तारखेबाबत केला मोठा खुलासा

Saturday, 21 November 2026, 9:54

‘अक्वान’ चक्रीवादळाचं संकट? राज्यात एकाच वेळी पाऊस आणि थंडीचा तडाखा! शेतकऱ्यांची चिंता वाढली

Saturday, 21 November 2026, 9:26

पुण्यात क्लास संचालकाला खंडणीसाठी धमकी! 10 लाखांची मागणी करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 21 November 2026, 9:19
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp