दीपक खिलारे
इंदापूर : भारतीय प्रजासत्ताक दिन (ता. २६ ) निमित्त इंदापूर बार असोसिएशनच्या वतीने इंदापूर न्यायालय चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती इंदापूर बार असोसिएशनचे ॲड. आशुतोष भोसले यांनी दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन इंदापूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. एल. पाटील व न्यायाधीश के.सी. कलाल यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मनोहर चौधरी उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेसाठी जी.पी. जोशी फाऊंडेशनचे ॲड. प्रसन्ना जोशी, इंदापूर बार असोसिएशनचे ॲड. सतीश देशपांडे, ॲड. हेमंत नरुटे, ॲड. लक्ष्मण शिंगाडे व ॲड. राजेंद्र सोमवंशी यांनी विशेष सहकार्य केले आहे.
या स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावेल्या संघास तसेच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज धारकास चषक बक्षिस देण्यात येणार आहे.
यावेळी ॲड. किरण धापटे, ॲड. राकेश शुक्ल, ॲड. रामदास इजगुडे, ॲड. सिद्धनाथ लोकरे, ॲड. आदित्य थोरात व सोहम घोडके आदी उपस्थित होते.