Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एक अड्डा, 90 मिनिटे अन् 84 ग्राहक! फुरसुंगीतील गांजाच्या ‘हॉटस्पॉट’वर पोलिसांचा थेट छापा; मोठं रॅकेट उघड?

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 6 August 2026, 14:58

पुणे : पुणे शहरातील फुरसुंगी परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 तरुणांना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून हजारो रुपयांचा गांजा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कारवाईदरम्यान गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या 84 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांना माहिती मिळाली होती की, जामिनावर बाहेर असलेल्या एका आरोपीने पुणे शहरातील विविध भागांमध्ये गांजा विक्रीचे अड्डे सुरू केले आहेत. त्याने काही तरुणांना कामावर ठेवून त्यांच्या माध्यमातून संघटित पद्धतीने अमली पदार्थ विक्रीचे जाळे उभे केले असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक 2 ने तुकाई टेकडी परिसरात सापळा रचला. त्यावेळी गांजा विक्री करताना स्वप्निल दयानंद गंधारे (वय 22, रा. हडपसर) आणि प्रतीक बाळू गाडे (वय 22, रा. हडपसर) या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यातत्यांचेविरुद्ध फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.नं ३४८/२०२६, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब), २९ अन्वये  गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सुमारे 73,800 रुपये किमतीचा गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाई सुरू असताना अनेक नागरिक गांजा खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. अवघ्या 90 मिनिटांत 84 जण त्या ठिकाणी पोहोचले. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, नोकरदार आणि इतर नागरिकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

 

पोलिसांनी या सर्वांची चौकशी करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच गांजा पुरवठा करणारे मुख्य आरोपी, आर्थिक व्यवहार, विक्रीचे इतर अड्डे आणि या नेटवर्कशी संबंधित व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. पुणे शहरातील अमली पदार्थ विक्रीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहिमा राबवल्या जात आहेत. या कारवाईमुळे शहरातील गांजा विक्रीच्या मोठ्या साखळीवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग)मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे 3) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अंमली पदार्थ विरोधी पथक 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या सूचनांनुसार सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, नितीनकुमार नाईक तसेच पोलीस अंमलदार देवकाते, कुंभार, चव्हाण, कळसकर, धांडे, यादव, महाडीक, जगताप, निंबोरे, गायकवाड, जोजारे, बास्टेवाड, मुंढे आणि महिला पोलीस अंमलदार साबळे, आंबले, दिवेकर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून 39 लाखांची मालमत्ता विकली! लोणी काळभोर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार, अनेकांवर गुन्हे दाखल

Saturday, 29 August 2026, 18:43

रेशन कार्डधारकांना धक्का! 18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे रेशन कार्ड होणार रद्द; नेमकं कारण काय?

Saturday, 29 August 2026, 18:18

पुणे-नाशिक महामार्गावर काळाचा घाला! ट्रकखाली दुचाकी चिरडली; बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज

Saturday, 29 August 2026, 17:25

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट! 10 प्रवक्त्यांची नवी फौज जाहीर; कुणाला मिळाली संधी?

Saturday, 29 August 2026, 16:52

SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई!भाजप पदाधिकाऱ्याला अटक; 5 BLO अधिकाऱ्यांच तातडीन निलंबन

Saturday, 29 August 2026, 16:09

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांना ब्रेक! शिरुर बायपासवर सर्व्हिस रोडची उभारणी, वाहतुकीला मिळणार सुरक्षित वाट

Saturday, 29 August 2026, 15:42
Next Post

चासकमान कालव्याच्या अस्तरीकरणाला न्हावरे परिसरातील शेतकऱ्यांचा एकमुखी पाठिंबा; काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp