दौंड : भारतीय जनता पक्षाचे दक्षिण पुणे जिल्हाचे एक दिवसीय अधिवेशन आज दौंड येथे माजी मंत्री प्रा. राम शिंदे, प्रदेश महामंत्री श्री.विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती दौंड येथे उत्साहात पार पडले. प्रसंगी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण बहुमत मिळवून देत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचे ऐतिहासिक यश मिळविल्याबद्दल, तसेच सहा दशकांनंतर देशात एका नेत्याला सलग तीनवेळा पंतप्रधान होण्याचा मान मोदीजींना मिळाल्याबद्दल त्यांचा अभिनंदनाच ठराव यावेळी माडण्यात आला.
तसेच भारतीय जनता पार्टी हा केवळ एक राजकीय पक्ष नसून राष्ट्रीय विचारांच्या पायावर उभा असणारा एक परिवार आहे. या परिवारातील कार्यकर्ते हीच या परिवाराची सर्वात मोठी ताकद आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने गेल्या दोन वर्षात राज्याला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणले असून, येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला महाराष्ट्राच्या हितासाठी महायुतीला निवडून आणायचे आहे. असा विश्वास यावेळी अनेकांकडून व्यक्त आला.
यावेळी आमदार योगेश टिळेकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, प्रदेश सचिव, नवनाथ पडळकर, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार शरद ढमाले, माजी आमदार अशोकराव टेकवडे आणि जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, स्वप्निल शहा, हरिभाऊ ठोंबरे, दिलीप खैरे, यांच्यासह जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, विविध आघाडी, मोर्चाचे अध्यक्ष, सर्व कार्यकर्ते, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.