Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोरमध्ये ‘जुन्या वादाचा’ मध्यरात्री स्फोट! दोन गटांचा रस्त्यावर राडा; ११ जणांविरोधात गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 19 July 2026, 14:14

लोणी काळभोर, ता. १९ : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील तोरणा खानावळसमोर शनिवारी (ता.18) रात्री जुन्या वादातून दोन गट आमनेसामने आल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सार्वजनिक रस्त्यावरच दोन्ही गटांतील सदस्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत आरडाओरडा आणि झोंबाझोंबी सुरू केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणत ११ जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

सुरज शांताराम भोंडवे (वय 24), लक्ष्मण गजानन भोंडवे (वय 24), प्रथमेश संदिप भोंडवे (वय 24), ओंकार भोंडवे (वय-19), बबन भोंडवे (वय 50, वरील पाचह रा आळंदी म्हातोबा ता हवेली जि पुणे), शुभम तावणे (वय 30), संग्राम काळभोर (वय 30 ) प्रथमेश गायकवाड (वय 25) ओंकार गायकवाड (वय 21, वरील चारही रा लोणी काळभोर, पुणे), अमित वाघमारे (वय 25), अक्षय कांबळे (वय 32, दोघेही रा. थेऊर गांव, पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई किरण गायकवाड यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई किरण गायकवाड व त्यांचे सहकारी पोलीस शिपाई मेमाणे हे रात्रीच्या बीट मार्शल ड्युटीवर असताना थेऊर फाटा परिसरात गस्त घालत होते. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास लोणी कॉर्नर येथील तोरणा खानावळसमोर मोठी गर्दी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे पोहोचल्यावर दोन गटांतील सुमारे दहा ते बारा जण एकमेकांना शिवीगाळ करत झोंबाझोंबी करत असल्याचे आढळून आले.

 

परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे यांना तात्काळ माहिती देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि सर्वांना वेगळे करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

प्राथमिक चौकशीत संबंधितांनी जुन्या वादावर तोडगा काढण्यासाठी एकत्र आल्याचे सांगितले. मात्र बोलणी सुरू असतानाच वाद पुन्हा उफाळून आला आणि त्याचे रूपांतर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ, आरडाओरडा आणि झोंबाझोंबीत झाले. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती. या प्रकरणी ११ जणांविरोधात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४(२) अंतर्गत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांची वेळेवर कारवाई; मोठा अनर्थ टळला

घटनेच्या वेळी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला नसता, हा वाद आणखी चिघळून गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता होती. पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नाही. सार्वजनिक रस्त्यावर झालेल्या या गोंधळामुळे लोणी काळभोर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. भररस्त्यात झालेल्या या प्रकाराची परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती. या घटनेचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21

हनीमून मर्डर मिस्ट्रीत मोठा ट्विस्ट! पतीचा काटा काढणाऱ्या सोनम रघुवंशीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Thursday, 23 July 2026, 18:43

सहाय्यक अभियंत्याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक! महावितरण कार्यालयात खळबळ

Thursday, 23 July 2026, 18:05

एक चप्पल अन् माती घसरल्याच्या खुणा… नाणेघाटात पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू

Thursday, 23 July 2026, 17:13
Krushi Nidhi

शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! कर्जमाफीची पहिली यादी आली; ‘ही’ अट पूर्ण नसेल तर लाभ हुकणार

Thursday, 23 July 2026, 16:48
Next Post

मुळशी हादरवणाऱ्या हत्याकांडाचा निकाल! शेतरस्त्याच्या वादातून भररस्त्यात सपासप वार केले; रक्ताच्या डागांवरून आरोपींचं बिंग फुटलं...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.