राहुलकुमार अवचट
यवत : बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड तालुक्यातील मतदार घटल्याचे दिसून आले. लोकसभेच्या मतदारयादीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. याबाबत अनेक कारणे असल्याचे सांगितले जात आहेत.
मतदार संख्या कमी होण्यामागे मयत, दुबार मतदारांमुळे फुगवटा आलेली मतदार यादी आता पारदर्शी झाली असून, एकूण ६००० हजार मतदार वगळले गेल्यामुळे मतदारांची संख्या दौंडमध्ये घटली असल्याची माहिती तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली. प्रारुप मतदार यादीत इतर मतदारसंघ टॉपवर असून, सर्वात कमी मतदार हे दौंड विधानसभा मतदारसंघात आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदार (विधानसभा)
२०१९ मध्ये ३,०९,१६८ होती २०२४ ची प्रारुप मतदार यादीत मतदार संख्या २,९९,२६० असल्याने दौंडची मतदार संख्या वाढलेली नसून घसरणीवर आहे. याचा अर्थ मतदार जनता दौंड सोडून जात आहे का? मतदार संख्या कमी होण्याच नेमकं कारण काय? दौंडचा म्हणावा तसा विकास झाला नाही का? असे एक ना अनेक प्रश्न दौंडमधील जागरूक नागरिक उपस्थित करत आहेत. दौंड विधानसभा मतदारसंघात मतदार संख्या घसरणीवर आल्याने दौंडच्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
२५ हजार नव मतदार बजावणार मतदानाचा हक्क
२०१९ मध्ये मतदार संख्या ३,०९,२६० होती. यादीत २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये मतदार कमी झाले आहेत. ३ लाख ५ हजार एवढी आहे. मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित व नाव आधार क्रमांकाला जोडले जात आहे. यामुळे दोन ठिकाणी नावे असणाऱ्या मतदारांची नावे सर्वेक्षणातून कमी झाली आहे. तसेच काही मतदारांचा मृत्यू झाला आहे. त्यांची नावे यादीतून कमी झाली आहे. यामुळे मतदार यादीत मतदार कमी झाल्याची शक्यता आहे. तर तालुक्यात २५ हजार नव मतदार यावर्षी मतदानाचा हक्क बजावणार असून, आता मतदान किती होणार हे देखील लवकरच समजणार आहे.
– अरुण शेलार, तहसीलदार
दहा हजार मतदारांचं नेमकं काय झालं?
२०१९ ची लोकसभा निवडणूक एप्रिल २०१९ ला झाली, त्यावेळी मतदार संख्या २,९५,६११ इतकी होती तर विधानसभा निवडणूक ऑक्टोंबर २०१९ झाली. त्यावेळी एकूण मतदार संख्या ३,०९,१६८ होती, म्हणजे या पाच महिन्यांत १३५५७ इतकी मतदार संख्या अचानक कशी वाढली आणि आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जवळपास १० हजार मतदार संख्या कमी कशी झाली हा चिंतेचा व गंभीर विषय असून, त्या १० हजार मतदारांच नेमक काय झालं आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील इतर तालुक्यातील मतदारांची संख्या वाढली, दौंड तालुक्यात मात्र आता नव्याने मतदार यादीत वाढ झाली की नाही हा प्रश्न तर निरंतर आहे. लवकरच जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन देऊन चौकशी करून सोक्षमोक्ष लावणार असल्याचे सांगितले.
– वसंत साळुंके,
जिल्हाध्यक्ष, शिवसंग्राम संघटना