पुणे : पाणी येत नसल्यास महानगरपालिकेच्या कार्यालयात जावे लागणार नाही, तसेच फोनवरुन तक्रार करण्यासाठी वेळेचे बंधन पाळावे लागणार नाही. कारण पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाने २४ तास हेल्पलाईन सुरु केली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली आहे.
पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले की, मनपाने २४ तास हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. त्यात नागरिक आपल्या तक्रारी करु शकतात. ०२०-२५५०१३८३ या क्रमांकावर लोकांना तक्रारी करता येईल. दाखल झालेल्या तक्रारीची त्वरित दखल घेऊन कारवाई केली जाईल. यामुळे या नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पावसकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील विविध भागांत पाणीपुरवठा केला जातो. त्यावेळी अनेक ठिकाणी काही तांत्रिक समस्या निर्माण होतात. त्यात नियमित पाणी न येणे, कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, जलवाहिनीतून पाणी वाहून जाणे, जलवाहिनी डॅमेज होणे यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेत. यामुळे आता पुणे महानगरपालिकेने २४ तास हेल्पलाईन सुरु केली आहे. यावरुन कधीही तक्रार करता येणार आहे.